scorecardresearch

Video: उष्णतेमुळे त्रस्त असलेला किंग कोब्रा गेला नळाजवळ, एका व्यक्तीने पाणी टाकून केलं शांत

उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी प्राणी पाणी असलेल्या ठिकाणी वावरताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Cobra
Video: उष्णतेमुळे त्रस्त असलेला किंग कोब्रा गेला नळाजवळ, एका व्यक्तीने पाणी टाकून केलं शांत

मार्च महिन्यातच उष्णतेचा कहर दिसून येत आहे. उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. यामुळे गळून गेल्यासारखं होत असल्याने कधी एकदा अंगावर गार पाणी किंवा फॅनखाली जाऊन बसतो, असं होतं. माणसांची अशी गत होत असताना यातून प्राणी तरी कसे सुटणार? उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी प्राणी पाणी असलेल्या ठिकाणी वावरताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किंग कोब्रा उकाड्यापासून दिलासा मिळवण्याासाठी एका घराजवळील पाण्याच्या नळाजवळ आल्याचं दिसत आहे. किंग कोब्रा उकाड्यापासून बचाव करण्यासाठी आल्याचं कळताच एक व्यक्ती मदतीसाठी पुढे येतो.

सापाला बघितलं की अनेकांची बोबडी वळते. मात्र अशा स्थितीत पाण्याच्या शोधात असलेल्या किंग कोब्रावर ती व्यक्ती पाण्याच्या बादली घेत पाणी टाकते. कोब्रा त्या ठिकाणाहून जराही न हलता संपूर्ण अंग पाण्याने ओलं होत असल्याने शांत असल्याचं दिसत आहे. काही क्षणात किंग कोब्रा प्रतिकार करेल असं वाटत असतं मात्र तो तसा काहीही करत नाही. हा व्हिडीओ पाहून भीती वाटते, हे मात्र तितकंच खरं आहे.

व्हायरल व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून अनेकांनी लाइक्स देखील केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: King cobra approaches water to relief from the heat a person throws water rmt

ताज्या बातम्या