scorecardresearch

लग्नातला नागिन डान्स नव्हे तर खऱ्या किंग कोब्राचा रोमँटिक डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच

लग्नातला नागिन डान्स तुम्ही सर्वांनी खूपदा पाहिला असेल, पण खऱ्याखुऱ्या सापांचा नागिन डान्स तुम्ही कधी पाहिला आहे का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

King-Cobra-Viral-Video
(Photo; Instagram/ snake_unity)

लग्न असो, वरात असो किंवा मग कोणती पार्टी, कोणत्याही खास प्रसंगी नागिन डान्स नसेल तर सोहळ्याचा आनंद अर्धा अधुरा राहिल्यासारखा वाटू लागतो. मुलं असोत की मुली, सगळेच नागिन डान्स करायला उत्सुक असतात. लग्नातला नागिन डान्स तुम्ही सर्वांनी खूपदा पाहिला असेल, पण खऱ्याखुऱ्या सापांचा नागिन डान्स तुम्ही कधी पाहिला आहे का? सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यात दोन कोब्रा साप रोमॅंटिक डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगल परिसरात दोन किंग कोब्रा हळू हळू एकत्र वर येत आहेत. या दोन्ही कोब्रांमध्ये रोमान्स सुरू असल्याचं दिसून येतंय. त्यानंतर दोघे एकमेकांसमोर येतात आणि प्रणयप्रसंगात मग्न झालेले दिसून येत आहेत. यावेळी नर कोब्राने मादीला किस करण्याचा देखील प्रयत्न केला. आतापर्यंत व्हायरल व्हिडीओमधून कोब्राची आक्रमकता दिसून आली, तसंच जंगलातील इतर प्राण्यांसोबत लढाई करताना दिसून आले. पण ज्यांचं नाव घेताच अंगावर काटा येतो अशा कोब्रांचा हा रोमॅंटिक मूड पाहण्यासारखा आहे. हे कोब्रा नर मादी फक्त रोमान्सच करत नाहीत तर दोघे एकत्र कपल डान्स देखील करताना दिसून येत आहेत. एकमेकांना अलिंगन देत एकमेकांभोवती गुंडाळलेले या व्हिडीओत दिसत आहे.

आणखी वाचा : तरुणांनी रस्त्यावर घातला गोंधळ, मग पोलिसांनी असा शिकवला धडा, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : सलूनमध्ये या व्यक्तीने बनवली विचित्र हेअरस्टाईल, VIRAL VIDEO पाहून लोक भडकले

जंगल परिसरात रोमान्स करणाऱ्या या कोब्राचं एक अनोख प्रेम पाहायला मिळालं. कोब्राच्या या रोमँटिक डान्सचा व्हिडीओ snake_unity नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ५५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. अनेक स्नेक लव्हर्सनी तर हा दुर्मिळ क्षण लोकांना पाहता यावा यासाठी सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यास सुरूवात केलीय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: King cobra naagin dance steps shocking video viral on social media prp

ताज्या बातम्या