King Cobra Snake Rescue Shocking Video : साप समोर पाहताच भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यात किंग कोब्रा असेल तर त्याच्या एका दंशाने काही मिनिटांत माणसाचा मृत्यू येऊ शकतो. त्यामुळे जंगलातील अनेक प्राणी त्याच्यापासून चार हात दूर राहतात. पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण किंग कोब्रापासून दूर राहणं तर सोडून द्या, तर चक्क त्याला असं काही पकडतो की, ते पाहून धडकी भरेल. किंग कोब्र्याच्या रेस्क्यूचा हा भयानक सीन अंगावर काटा आणणारा आहे.
लोक या तरुणाला ‘रिअल स्नेक रेस्क्यू मॅन’ म्हणत आहेत आणि एवढ्या धोकादायक परिस्थितीतही याच्याकडे इतके धैर्य कुठून आले, असा प्रश्न विचारत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक तरुण अत्यंत धोकादायक कोब्रा सापाला मोठ्या हिमतीने रेस्क्यू करताना दिसत आहे. साप सतत फणा काढून फुत्कारत होता आणि कोणत्याही क्षणी हल्ला करण्याच्या तयारीत होता. मात्र, रेस्क्यू करणाऱ्या तरुणाने जराही न घाबरता सापाला थेट तोंडाजवळून (गळ्यापासून) पकडले आणि त्याला पूर्णपणे नियंत्रणात आणले. ही पद्धत अत्यंत बेजबाबदार आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी असली तरी हा संपूर्ण प्रसंग अत्यंत थरारक आहे.
तरुण ज्या कौशल्याने सापाला पकडत आहे ते पाहून लोक अवाक झाले आहेत. थोडीशी चूक झाली असती तरी मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, असा कोणताही साप दिसल्यास त्याला स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता, तातडीने वन विभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्राशी संपर्क साधा.
सोशल मीडियावर युजर्सच्या प्रतिक्रिया
किंग कोब्राचा हा थरारक व्हिडीओ @zilanimullah नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर युजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली, “सापाला पकडणारा खरा पुरुष तर हाच आहे.” तर दुसऱ्या एका युजरने मिश्किलपणे लिहिले, “हा माणूस एका चुकीमुळे स्वतःचा जीव गमावणार होता.”
इतर काही युजर्स म्हणाले की, थोडीशी जरी चूक झाली असती तरी सर्व काही संपले असते. अनेक जण तरुणाच्या धाडसाचे कौतुक करीत असले तरी अशा धोकादायक गोष्टी फक्त प्रशिक्षित तज्ज्ञांनीच कराव्यात, असा सल्लाही देत आहेत.
