King of jungle lion and dog friendship video goes viral on social media gps 97 | Loksatta

Video: खरंच राजाच म्हणावं लागेल ‘या’ सिंहाला! समोर आलेल्या श्वानावर हल्ला न करता त्याचे चुंबन घेतले अन…

तुम्ही कधी कुत्रा आणि मांजर यांच्यामधील प्रेमळ मैत्री पहिली आहे का? नसेल तर हा Video एकदा पाहाच…

Video: खरंच राजाच म्हणावं लागेल ‘या’ सिंहाला! समोर आलेल्या श्वानावर हल्ला न करता त्याचे चुंबन घेतले अन…
photo(social media)

Animal Friendship Video: सिंह हा पृथ्वीवरील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. एकदा का तो आपल्या शिकारीच्या मागे गेला की त्याच्यासाठी निसटणे फार कठीण असते. जंगलात सिंहाने गर्जना जरी केली तरी मोठ- मोठे प्राणी पळून जातात. पण तुम्ही कधी विचार करू शकता का की असा धोकादायक प्राणी आपल्या शिकारीशी सुद्धा मैत्री करू शकतो.

कुत्रा आणि सिंहाची मैत्री पाहण्यासारखी आहे

खरं तर सिंह आणि कुत्रा यांच्यामधील मैत्रीचा आपण विचारही करू शकत नाही. मात्र असं घडलंय, सिंहाने आपल्या शिकारीशी मैत्री केली आहे. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. एका मोकळ्या मैदानात एक कुत्रा उभा असल्याचे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. जणू तो कोणाची तरी वाट पाहत आहे. पण तेव्हाच एक प्रचंड आकाराचा सिंह तेथे येतो. पहिल्यांदा असं वाटतं की तो जणू या कुत्र्याला एका झटक्यात पकडेल.

पण असे काही होत नाही. सिंह मोठ्या प्रेमाने कुत्र्याजवळ जातो आणि त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला. इथे कुत्राही त्याच्याबद्दल आपुलकी दाखवतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सिंह देखील कुत्र्याबद्दल प्रेम दाखवत त्याच्या पुढच्या पायाचा पंजा वर करून त्याचे चुंबन घेऊ लागतो. व्हिडिओतील हे दृश्य कोणालाही थक्क करेल.

( हे ही वाचा: Video: टॉवेल गुंडाळून ‘तो’ थेट मेट्रोत शिरला; आत जाताच असं काही केलं की मुलींनी तोंडच लपवली)

जंगलाच्या राजाचा व्हिडिओ पहा

( हे ही वाचा: Video: नकली पोशाख घालून ‘तो’ चक्क मगरीजवळ जाऊन झोपला; तिचा पाय ओढला अन् तितक्यात…अंगावर काटा आणेल ‘हा’ क्षण_)

कुत्रा आणि सिंह यांच्या मैत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सनाही आवडला आहे. नेटिझन्स या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत. इंस्टाग्रामवर beautiful_new_pix या हँडलसह शेअरही करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 13:07 IST
Next Story
८६ व्या वर्षीही इतका फिटनेस? या महिलेचे व्यायाम पाहून तुम्हीही व्हाल थक्क