scorecardresearch

Nalinee Mumbaikar : १२ व्या वर्षी अंगावर स्वयंपाकाची जबाबदारी आली आणि….

Kitchen Queen Nalinee Mumbaikar : नलिनीताईविषयी कधी न ऐकलेल्या गोष्टी आणि अचंबित करणारा त्यांचा जीवनप्रवास आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Kitchen Queen Nalinee Mumbaikar Home Made Koli Seafood reels video instagram youtube
नलिनी मुंबईकरची प्रेरणादायी कहाणी (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Kitchen Queen Nalinee Mumbaikar : नलिनी मुंबईकर हे रिल्स आणि व्हिडीओच्या जगातील एक असं नावं आहे ज्यांनी एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. रुचकर स्वयंपाक बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नलिनी मुंबईकर यांनी लोकसत्ताच्या इन्फ्ल्यूएंसरच्या जगात या खास सिरीजमध्ये हजेरी लावली.
स्वयंपाक बनवायला आणि खायची आवड असणारा प्रत्येक व्यक्ती हा नलिनीताईंचा चाहता असू शकतो. नलिनीताईंनी इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओवर युजर्स कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करतात.याच नलिनीताईंविषयी कधी न ऐकलेल्या गोष्टी आणि अचंबित करणारा त्यांचा जीवनप्रवास आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

नलिनीताई अत्यंत साधं व्यक्तिमत्त्व. कधीही कुठे बाहेर गेलेल्या नाही. घर, जबाबदारी सांभाळणाऱ्या नलिनीताई स्टार असूनही आजही मासे विकायला जातात. घरची कामे आवरुन नंतर व्हिडीओसाठी वेळ काढतात.
साधं आयुष्य जगणाऱ्या नलिनीताई जेव्हा स्टार बनल्या, तेव्हा त्यांच्या आयुष्यात काय बदल दिसून आला, आजुबाजूंच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती? याविषयी नलिनीताई दिलखुलासपणे व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे. याशिवाय काही भन्नाट किचन टिप्स सुद्धा त्यांनी दिल्या आहेत.

Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

नलिनीताईंबरोबरच्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लोकसत्ताच्या पेजवर व्हिडीओ सेक्शनला भेट द्यायला विसरू नका.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kitchen queen nalinee mumbaikar home made koli seafood reels video instagram youtube ndj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×