डिक्शनरीमध्ये नवीन शब्द जोडले जात असताना ही वर्षातील टाय आहे. द इंडिपेंडंट मधील एका अहवालात असे म्हटले आहे की सध्याची परिस्थिती आणि त्यात येऊ घातलेले संकट हे निवडलेल्या शब्दांमध्ये सामील झाले आहेत. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये “हवामान आपत्ती” (climate catastrophe) , “निव्वळ शून्य” (net zero) आणि “इको-चिंता” (eco-anxiety) सारखे शब्द जोडले गेले आहेत, असे अहवालात म्हटले आहे. अवाहालानुसार “ग्लोबल हीटिंग”(global heating) हा देखील शब्द जोडला गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्यतिरिक्त “हवामान संकट” (climate crisis) , “हवामान संप” (climate strike) आणि “हवामान न्याय” (climate justice”) हे शब्द जोडले गेले आहेत. अहवाल पुढे सांगतो, हे शब्द, हवामान बदलाभोवती नवीन भाषा शोधण्यासाठी समर्पित आहे. हे शब्द कॉप२६ , २०२१ युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्सच्या आधी लॉंच करण्यात आले आहे, पुढील महिन्यात ग्लासगो येथे जागतिक नेत्यांची बैठक होणार आहे”.

( हे ही वाचा: हवामानाचे अपडेट देत असताना अचानक प्ले झाला पॉर्न व्हिडीओ, टीव्ही अँकरचा व्हिडीओ व्हायरल! )

“जागतिक नेते हवामान बदलाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी एकत्र येत आहेत, तेव्हा हवामान आणि टिकाऊपणाबद्दल बोलले जाईल , आता आणि भूतकाळात आपण वापरत असलेल्या भाषेचा सखोल अभ्यासही होईल, ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचे विज्ञान संपादक ट्रिश स्टीवर्ट यांना एका निवेदनात म्हटले आहे.

( हे ही वाचा: स्वच्छता कर्मचाऱ्याने कचऱ्यात सापडलेले १०० ग्रॅम सोन्याचे नाणे केले परत;त्याच्या प्रामाणिकतेचे केलं जातयं कौतुक )


“आता आपल्यावर असलेली अत्यावश्यकतेची खरी जाणीव आपल्या भाषेत दिसून येते. पुढे काय घडते हे अनेक घटकांवर अवलंबून असते परंतु, एका गोष्टीची आपण खात्री बाळगू शकतो की आपली भाषा विकसित होत राहील आणि कथा सांगितली जाईल.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know what new words were added to the oxford english dictionary ttg
First published on: 25-10-2021 at 10:09 IST