Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ दरदिवशी व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. तुम्ही डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आवडीने डान्स करताना दिसतात. सध्य असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. होळी आणि शिमगा हा कोकणातील एक महत्त्वाचा आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणारा सण आहे. यात गावोगावी पारंपरिक होळी पेटवली जाते, तसेच शिमगोत्सव अंतर्गत नाचगाणी, पारंपरिक ढोल-ताशांचे वादन, विविध देखावे आणि जत्रा भरवण्यात येते. या सणासाठी प्रत्येक वर्षी लाखो मुंबईकर कोकणात जातात. अशाच कोकणाच्या दिशेनं निघालेल्या काही हौशी तरुणांनी प्लॅटफॉर्मवरच कोकणातील लोकप्रिय बाल्या डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय…
कोकणात शिमगोत्सवाची चाहूल लागली असून गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक ढोल-ताशांच्या निनादात आणि रंगीबेरंगी मिरवणुकांच्या तयारीत संपूर्ण परिसर दुमदुमू लागला आहे.याच पार्श्वभूमीवर मुंबईकर आता कोकणाच्या दिशेने निघाले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रेल्वे स्टेशनवर सर्व जण रिंगण करून डान्स करताना दिसत आहे.त्यांच्या अप्रतिम डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. कोकणात या डान्सला बाल्या डान्स म्हणतात. या व्हिडीओवर लिहिलेय, “कोकणात गावी जायचं तर फक्त दिवा रत्नागिरी ट्रेन ने…!चाकरमानी निघाले शिमग्याला गावी वीर रेल्वे स्टेशन वर केलेला नाच “
या व्हिडीओमध्ये तुम्ही आजूबाजूलाही पाहू शकता, इतर कोकणी प्रवासी तरुणांचा हा डान्स पाहून खूप झाले आहे. तसेच त्यांना टाळ्या वाजून प्रोत्साहन देताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ kokancha_yash_08 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय… ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजरने लिहिलेय,”विषय संस्कृतीचा” तर एका युजरने लिहिलेय, “कोकण स्वर्गच आहे ” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही मज्जाच वेगळी” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

