Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ दरदिवशी व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. तुम्ही डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आवडीने डान्स करताना दिसतात. सध्य असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोकणातील लोकप्रिय बाल्या डान्स करताना लोक दिसताहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (kokan video balya dance traditional folk dance from kokan video goes viral on social media)

कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय…

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काही लोक खाली बसलेली दिसेल. आणि ते लोक गाणं गाताना आणि वादन करताना दिसत आहे. त्यांच्या भोवती लहान मुलांपासून प्रौढ लोकांपर्यंत सर्व जण रिंगण करून डान्स करताना दिसत आहे. ते खाली बसलेल्या लोकांभोवती फिरून डान्स करताना दिसतात. त्यांच्या अप्रतिम डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. कोकणात या डान्सला बाल्या डान्स म्हणतात. या व्हिडीओवर लिहिलेय, “कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय… “

हेही वाचा : बाई हा काय प्रकार! काकूंनी केला असा योगा की VIDEO पाहून पोट धरुन हसाल; लहान लेकरं तर पळून जातील

पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)

_sneha_bhalekar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय… ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजरने लिहिलेय,”विषय संस्कृतीचा” तर एका युजरने लिहिलेय, “कोकण स्वर्गच आहे ” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही मज्जाच वेगळी” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : VIDEO : “शॉर्ट्स पुरुषांनी घालायचे असतात, मुलींनी नाही”, वृद्ध महिलेने इन्फ्लुअन्सरला भररस्त्यात सुनावलं; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा!

बाल्या डान्स हा कोकणची लोककला आहे. यालाच जाखडी नृत्य सुद्धा म्हणतात. शक्ती तुरा म्हणून सुद्धा हे नृत्य ओळखले जाते.बाल्या डान्स हा रत्नागिरी रायगड जिल्ह्यात विशेष प्रसिद्ध आहे. बाल्या डान्समध्ये गाणं म्हणणारे आणि वादक मंडळी मध्यभागी बसलेले असतात आणि बाकी नाच करणारी मुलं त्यांच्या भोवती गोल रिंगण करून नाचतात. बाल्या डान्समध्ये पूर्वी महिलांचा सहभाग कमी असायचा पण आता मुली महिला सुद्धा बाल्या डान्स आवडीने करतात.