Halgi Dance Viral Video: शाळा म्हटलं की आपल्या अनेक जुन्या आठवणी ताज्या होतात. शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. शाळेतल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी नेहमीच आपल्या स्मरणात असतात. हल्ली गावाकडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील काही विद्यार्थी शाळेच्या ग्राऊंडवर हलगीच्या तालावर ठेका धरताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यातील एखादाच व्हिडीओ खूप चर्चेत येतो. याच चर्चेत असलेल्या व्हिडीओंमुळे त्या व्हिडीओतील लहान मुलंदेखील चर्चेत येतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील हुपरीच्या एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो हालगीवर ठेका धरताना दिसला होता. या चिमुकल्याच्या व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले. दरम्यान, आता याच चिमुकल्याने त्याच्या शाळेतील एका कार्यक्रमातही ठेका धरल्याचे दिसत आहे.

Students Fight Video two students fight on coaching centre
छडी गेली आणि सोबत शिस्तही; विद्येच्या मंदिरात दोन विद्यार्थ्यांनी ओलांडली मर्यादा, VIDEO पाहून सांगा अशा मुलांचं करायचं काय?
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Nagpur's Young Girl's Paati on Women’s Respect Goes Viral
“लोकं बोलतात बाईच्या डोक्यावर पदर असावा पण त्यापेक्षा…” नागपूरच्या तरुणीची पाटी चर्चेत, पाहा Photo
School Boy stunning dance on Dilbar Dilbar
नोरा फतेहीच्या ‘दिलबर दिलबर’ गाण्यावर विद्यार्थ्याचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हा नोराचा…”
Student told Hilarious Math Full Form funny Answer
MATHS चा फुल फॉर्म माहितेय? विद्यार्थ्याने दिले भन्नाट उत्तर, पाहा Viral Video
Zilla Parishad school Viral Video
“इथे शिक्षणावर प्रेम केलं जातं…” जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी नाचत नाचत गायलं पावसाचं गाणं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक
The teacher sang the song Bappa Morya Re
“शाळा असावी तर अशी…”, शिक्षकाने गायलं ‘बाप्पा मोरया रे’ गाणं अन् विद्यार्थ्यांनी दिली साथ; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “असे शिक्षक प्रत्येक शाळेत…”
Zilla Parishad school playing Lazim with learn tables
‘आरारारा खतरनाक…’ लेझीम खेळत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी म्हणाले बे चा पाढा; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

विद्यार्थ्यानी धरला ठेका? (Viral Video)

हा व्हिडीओ कोल्हापुरातील एका प्राथमिक शाळेतील असून या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेतील काही विद्यार्थी हलगीच्या तालावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यावेळी प्रत्येक जण जमेल तसा डान्स करत असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुंदर एक्स्प्रेशन्स पाहायला मिळत आहेत. तसेच हलगीच्या डान्समुळे प्रसिद्ध झालेला छोटा चिमुकलादेखील नाचण्यात गुंग झाल्याचे दिसत आहे. सध्या या विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bsl_memes_19 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून, यावर ९० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करत आहेत.

हेही वाचा: ‘काकी जरा थांबा…’ महिलांचा योगा पाहून नेटकरी चक्रावले; VIDEO पाहून माराल कपाळावर हात

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हायरल व्हिडीओवर एका युजरने लिहिलंय की, “याच्यासाठी मराठी शाळेमध्ये शिक्षण घ्यायला लागतंय”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “जिल्हा परिषद मराठी शाळा”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “हा हलगी डान्सर कृष्णराज वायंगुडे आहे. रातोरात फेमस झालंय हे बाळ”, तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “हीच पोरं पुढे व्यवसाय करतात आणि पुढे जातात, कारण त्यांच्यात हिंमत असते, लोक काय म्हणतील याचा ते विचार नाही करत.”