Koli song dance: सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्व जण बिनधास्त डान्स करताना दिसतात. शाळा कॉलेजातील मुलांचे सुद्धा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.काही लोक तर सार्वजनिक ठिकाणीही बिनधास्त डान्स करुन त्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. सोशल मीडिया हे लोकांसाठी आपल्या कला सादर करण्याचे एक अनोखे माध्यम बनले आहे. कोणी डान्स, तर कोणी स्टंट, तर कोणी चित्रकलेच्या माध्यमातून आपले कौशल्य जगासमार मांडतात. गेल्या काही दिवसांपासून आगरी तरुणींचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स या तरुणींचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकदा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.

लोकगीतांतील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ‘कोळीगीते’. त्यात मुंबई आणि कोळीगीते हे समीकरण अविभाज्य. या गीतांची पोहोच जातीपातींच्या सीमा ओलांडून कधीच पुढे गेली आहे. म्हणून सणसमारंभ, लग्नसोहळे कुठेही असो कोळीगीते वाजली नाहीत असे होणे कठीणच. मग ते ‘हे पावलाय देव माझा मल्हारी’, ‘एकवीरा आई गो एकवीरा आई’, ‘हिंगालय देवी’, ‘वेसावची पारू’ किंवा गेल्या दशकापूर्वीचे ‘रसिकाच्या लग्नात’ असो. या गाण्यांचा प्रभावच वेगळा. आगरी-कोळी समाजातील अनेक तरुण मुले कोळीगीतांचा हा वारसा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सण-उत्सव, लगीन गीते, प्रेम गीते या माध्यमातून ते आपली कला आणि संस्कृती मांडत आहेत. अशाच दोन तरुणींनी कोळी गाण्यावर डान्स करत नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुणीला रस्त्याच्या कडेला “टिमक्याची चोली बाय रंगानं फुलयली” या कोळी गाण्यावर सुंदर पद्धतीनं डान्स करत आहेत. सोशल मीडिया म्हणजे व्हिडीओंचा खजाना आहे. इथे कधी काय व्हायरल होईल याचा काहीही नेम नाही. अशाच या तरुणींचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ yashvibhoir__081 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यावर नेटकरीही भरभरून कमेंट करत आहेत. यावेळी एका युजरने म्हंटलं, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशीच जपा. तर दुसऱ्या युजरने कमेंट केली “जबरदस्त ठसका” तर आणखी एकानं काय ती ‘कातील अदा’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.