scorecardresearch

Premium

‘या’ देशात विकली जाते चक्क ‘गुलाबजाम कॉफी’! पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ व्हिडीओ….

इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्या गेलेल्या ‘गुलाबजामुन लाटे’चे फोटो आणि व्हिडीओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. हा नवीन प्रकार नेमका काय आहे ते पाहा.

New York Gulab jamun latte viral post
न्यू यॉर्कमध्ये विकली जाते, 'गुलाब जमून लाटे' नावाची कॉफी. [photo credit – इन्स्टाग्राम]

सोशल मीडियावर विचित्र वा भयंकर पदार्थांचे असंख्य व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. फॅन्टा मॅगी, ओरिओ वडे, फळांचा चहा, चीज घातलेले संत्र्याचे सरबत… ही यादी कधीही न संपणारी आहे. पण सगळेच पदार्थ असे विचित्र असतात, असे नाही. दोन भलत्याच पदार्थांना एकत्र केल्यानंतर ते नेहमीच वाईट लागतील, असे नसते. अशातच या एका नवीन ‘फूड कॉम्बिनेशन’ची भर या यादीमध्ये पडली आहे. आता हा पदार्थ सर्वांच्या लाडक्या गुलाबजामपासून बनवला गेला आहे. परंतु, गुलाबजामपासून बनवलेला हा पदार्थ भारतात नाही, तर चक्क भारताबाहेरील एक रेस्टॉरंटमध्ये बनवला गेला आहे. गुलाबजाम आणि कॉफी, असे दोन वेगळे पदार्थ एकत्र करून नक्की कुठे विकले जात आहे ते पाहा.

न्यूयॉर्कमधील कोलकात चायको [kolkatachaico] या रेस्टॉरंटने आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील अधिकृत अकाउंटवरून, ‘गुलाबजाम लाटे [latte]’ या नवीन पेयाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. हे पेय गरम आणि गार अशा दोन्ही स्वरूपांत मिळू शकते. ” ‘द गुलाबजामुन लाटे’ या नवीन पेयाचे स्वागत करू या. खवा आणि केशर घालून बनवल्या जाणाऱ्या गुलाबजाम या मिठाईला आम्ही लाटेच्या स्वरूपात घेऊन आलो आहोत. गरम किंवा गार अशा दोन्ही प्रकारे तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. हिवाळी पदार्थांमध्ये हे पेय कायम उपलब्ध असेल,” अशी कॅप्शन त्याखाली पाहायला मिळते.

Customer orders 1 fish fry Zomato responds with Paani mein gayi Zomato shared the post on social media platform X
जेव्हा झोमॅटोही ‘छपाक’ खेळ खेळतो तेव्हा…; ग्राहकाने ‘फिश फ्राय’ मागवताच, म्हणाले, “पानी में गई”; Chat व्हायरल
youtubers in trouble over prank video
“अंबानींबरोबर चहा घेतलेले काका”, युट्यूबवरील प्रँक VIDEO पडला महागात! गुजरातमध्ये नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर!
A video of police lathicharge on protesters in Mumbai is being shared as Haldwani violence.
Fact Check : लाठीचार्जचा व्हायरल व्हिडिओ उत्तराखंडमधील हलद्वानीचा नव्हे तर मुंबईतील घाटकोपरचा! जाणून घ्या काय आहे सत्य?
new india assurance recruitment 2024
नोकरीची संधी : न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि. मधील संधी

हेही वाचा : अरे बापरे! आपल्याच वडिलांना ओळखणे झाले मुश्कील…; जुळ्या मुलींच्या निरागस प्रतिक्रियेचा व्हिडीओ पाहा

‘गुलाबजामुन लाटे’च्या या पोस्टवर दोन लाख इतके व्ह्युज आले असून, त्यावर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहू.

खरे तर गुलाबजाम आणि कॉफीच्या या कॉम्बिनेशनवर लोकांनी वर वाईट प्रतिक्रिया दिल्या असतील, असे तुम्हाला वाटत असेल, तर तसे मुळीच नाही. याउलट नेटकऱ्यांनी या जोडीचे फार कौतुक केलेले आपल्याला पाहायला मिळेल.

एकाने, “हा पदार्थ व्हेगन म्हणूनही मिळेल का?” असे विचारले आहे. तर, दुसऱ्याने, “वाह.. दिसायलाच फार सुंदर दिसतो आहे,” असे लिहिले. तिसऱ्याने, “या लाटेमध्ये, बोबा टी [boba tea- चहाचा एक प्रकार] प्रमाणे गुलाबजाम असतील का,” असा प्रश्न केला आहे. “सांस्कृतिक क्रांती यालाच म्हणतात,” असे काहीसे चौथ्या नेटकऱ्याने म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kolkata chai co new york restaurant permanently added gulab jamun latte in their winter menu viral video dha

First published on: 11-12-2023 at 17:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×