आधी टिकटॉक आणि आता इन्स्टाग्राम रिल्समुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चॅलेंजेचा भडीमार होतोय. या वेगवेगळ्या चॅलेंजेसमुळे सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओनी धुमाकूळ घातलाय. विशेषत: गेल्या वर्षभरापासून. व्हिडीओ बनवण्यासाठी कोण कधी काय करेल याचा काही नेम नाही आणि हे वेड कधी डोक्यात येईल हे ही काही सांगता येत नाही. सध्या एका तरूणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ बनवण्यासाठी या तरूणीने चक्क एका सुपरमार्केटमध्ये खरेदी करता करता डान्स केलाय. नेटिझन्सना या व्हिडीओमधील मुलीने बिनधास्त अंदाज खूपच आवडलाय.

काही लोक बिनधास्तपणे आपलं जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात. आपलं आयुष्य जगत असताना त्यांना समाजाची काही पडलेली नसते. अशाच एका बिनधास्त तरूणीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियार धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ पाहून लोक नॉस्टॅल्जिंक होत आहेत. या व्हायरल व्हिडीओमधील तरूणीने सुपरमार्केटमध्ये खरेदी करता करताच ‘नवराई माझी’ या गाण्यावर डान्स केलाय. यावेळी तिने आपल्या चेहऱ्यावर गोड एक्प्रेशन्स देत लाखो लोकांची मनं जिंकली आहेत.

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

या व्हायरल व्हिडीओमधली ही तरूणी कोलकत्तामधील असून न्याशा झेन असं तिचं नाव आहे. ही कोलकत्ता गर्ल एका सुपरमार्केटमध्ये शॉपिंग कार्ट ड्रॅग करत असताना अचानक ‘नवराई माझी लाडाची लाडाची गं’ या गाण्यावर ठुमके लावत डान्स करण्यात सुरूवात केली. विचित्र स्टिकर्ससह राखाडी रंगाचा जंपसूट परिधान केलेली ही कोलकर्ता गर्ल मराठी गाण्यावर डान्स करताना खूपच गोड दिसून येत आहे. लोकांच्या गर्दीने भरलेल्या या सुपरमार्केटमध्ये डान्स करत असताना ती ती अजिबात लाजली नाही. सुपरमार्केटमधील आजुबाजुचे लोक तिचा डान्स पाहत होते. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

न्याशा झेनने स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे आणि आतापर्यंत २५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी तिचा हा डान्स पाहिलाय. नेटिझन्सना तिचा हा बबली परफॉर्मन्स खूपच आवडलाय आणि कमेंट्स सेक्शनमध्ये हार्ट इमोजी शेअर करत तिचं कौतुक देखील केलं जातंय. या तरूणीचा हा डान्स पाहून तुम्ही तिचे चाहते व्हाल. कुणाचीही पर्वा न करता ही तरूणी मजेदार डान्स करतेय. तिचा हा बिनधास्त अंदाज नेटकऱ्यांना खूपच भावलाय.