kolkata rape murder case virat kohli statement fact check : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर होत असल्याचे आढळले. या व्हिडीओमध्ये भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेबद्दल दुःख व्यक्त करीत बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करताना दिसला. पण, खरेच विराट कोहलीने व्हिडीओ पोस्ट करीत अशी कोणती मागणी केली आहे का याचा आम्ही तपास सुरू केला. त्यावेळी एक वेगळेच सत्य समोर आले. हे सत्य नेमके काय आहे ते जाणून घेऊ… काय होत आहे व्हायरल? कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात आवाज उठवीत, बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी विराट कोहलीकडून मागणी केली जात असल्याचा हा व्हिडीओ बऱ्याच युजर्सनी शेअर केला. कोलकात्ता बलात्कार खून प्रकरणातील आरोपीला फाशी द्या, कोहलीची मागणी तपास : आम्ही व्हिडीओवरून मिळविलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला. कीफ्रेमद्वारे आम्हाला X हॅण्डलवर अपलोड केलेला व्हिडीओ आढळला. आम्हाला इतर सोशल मीडिया हॅण्डलवरदेखील हा व्हिडीओ सापडला. व्हिडीओ सारखाच दिसत होता. त्यानंतर आम्ही या व्हिडीओमधून मिळविलेल्या कीफ्रेमवर पु्न्हा रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला. त्यामुळे आम्हाला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या एक्स हॅण्डलवर अपलोड केलेला तत्सम व्हिडीओ सापडला. हा व्हिडीओ एक मिनिटाचा होता. आम्हाला संपूर्ण व्हिडीओ रॉयल चॅलेंजर्सच्या YouTube चॅनेलवर सापडला. Read More kolkata rape murder case Related News : Kolkata Rape Murder Case: आरोपी संजय रॉयचा वाढदिवस माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या कार्यालयात झाला साजरा? समजून घ्या नेमकं सत्य दोन वर्षांपूर्वी अपलोड केलेल्या व्हिडीओचे शीर्षक होते : RCB Podcast : How the IPL Changed My Life ft. Virat Kohli | Full Episode https://www.youtube.com/watch?v=xDUCdSgNGSg&t=412s त्यानंतर आम्ही गुगल कीवर्ड सर्चद्वारे विराट कोहलीने कोलकाता प्रकरणावर कोणतेही विधान जारी केले आहे का ते तपासले. आम्हाला आढळले की, त्याने यापूर्वी विनयभंगाच्या प्रकरणाचा निषेध केला होता; परंतु कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणाबाबत अद्याप कोणतेही विधान जारी केलेले नाही. निष्कर्ष : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली कोलकाता प्रकरणावर दुःख व्यक्त करीत बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करीत असल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडीओ एडिटेड आणि खोटा आहे. कोहलीने असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.