Kolkata Rape Murder Case Fact Check Video : आर. जी. कर हॉस्पिटलमध्ये झालेल्या क्रूर बलात्कार आणि खून प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकरणावरून कोलकातासह देशभरात निदर्शने केली जात आहेत. याचदरम्यान लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचा आढळून आला आहे. या फोटोत एक व्यक्ती केक कापताना दिसत आहे. ही केक कापणारी व्यक्ती कोलकाता बलात्कार आणि खून खटल्यातील आरोपी संजय रॉय असल्याचा दावा करण्यात आला आहे. आरोपी संजय रॉय याचा आर. जी. कर मेडिकल कॉलेजमधील माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या कार्यालयात वाढदिवस साजरा केला होता, असा दावा या फोटोसह करण्यात आला आहे.

काय होत आहे व्हायरल?

इन्स्टाग्राम युजर अल्टिमेट ट्रोल्सने त्याच्या प्रोफाइलवर व्हायरल फोटो शेअर केला आहे.

Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
Lalbaug Accident News
Lalbaug Accident : मद्यधुंद प्रवाशामुळे नुपूर मणियारचा मृत्यू, लालबागच्या अपघातात कुटुंबाने कर्ती लेक गमावली
sunil tingre connection with Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार टिंगरेंची चौकशी केल्याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दुजोरा
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल

इतर वापरकर्तेदेखील हाच दावा शेअर करत आहेत.

तपास:

व्हायरल फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही आमचा तपास सुरू केला.

आम्हाला हा फोटो CALCUTTA NATIONAL MEDICAL COLLEGE AND HOSPITAL RESIDENT DOCTORS ASSOCIATION

cnmcrda इन्स्टाग्राम अकाउंटवरदेखील सापडला. हा फोटो सहा दिवसांपूर्वी अपलोड केला होता.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे : आज, CNMC चे निवासी डॉक्टर एकजुटीने उभे राहिले आणि त्यांनी संस्थेतील भ्रष्टाचाराची जबाबदारी घेण्याच्या मागणीसाठी अधीक्षक कार्यालयाला घेराव घातला.

CNMC&H मधील अधिकृत डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून तैनात केलेल्या प्रसून चॅटर्जी याने आज सकाळी हजेरी रजिस्टरमध्ये स्वाक्षरी केली, परंतु चौकशी केली असता तो ड्युटीवर उपस्थित नसल्याचे दिसून आले.

प्रसून याठिकाणी पूर्णवेळ नोकरीवर असण्याबरोबर त्याचा संदीप घोष यांच्याही परिचयाचा असल्याचे दिसून आले, दरम्यान प्रसून ९ ऑगस्ट रोजी घटनेवेळी त्या ठिकाणी उपस्थित होता.

आम्ही @CBI कडे ९ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसून चॅटर्जीचा ठावठिकाणा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून संदीप घोष यांच्याशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमच्या संस्थेतील सत्तेचा दुरुपयोग आणि भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही.

पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, फोटोतील व्यक्ती प्रसून चॅटर्जी आहे.

Google कीवर्ड शोध चालू केल्यावर, आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाचा लेख सापडला.

https://timesofindia.indiatimes.com/city/kolkata/kolkata-police-to-issue-fresh-notices-over-fake-news/articleshow/112905158.cms

लेखात नमूद केले आहे की : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, असाच एक बनावट फॉरवर्ड फोटो आहे ज्यात कथितपणे आर. जी. करचे माजी प्राचार्य संदीप घोष त्यांच्या कार्यालयात बसलेले आणि मुख्य आरोपी संजय रॉय यांच्याबरोबर केक कापून वाढदिवस साजरा करत असल्याचे दाखवले आहे. पोलिसांनी सांगितले की, हा फोटो कोणत्याही नागरी स्वयंसेवकाचा किंवा संजय रॉयचा नसून घोष यांच्या पर्सनल डेटा ऑपरेटरचा आहे.

निष्कर्ष : आर. जी. करचे प्राचार्य संदीप घोष यांच्या केबिनमध्ये केक कापत असलेल्या व्यक्तीचा व्हायरल फोटो कोलकाता बलात्कार खून प्रकरणातील आरोपी संजय रॉय याचा नाही. फोटोतील व्यक्ती प्रसून चॅटर्जी आहे, जे डेटा एंट्री ऑपरेटर आहेत. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.