Konkan Ganpati Video: सध्या संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह साजरा केला जात असून आज गणेशोत्सवाचा आठवा दिवस आहे. गणेशोत्सव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. पण, प्रामुख्याने कोकणात या सणाचा उत्साह अधिकच पाहायला मिळतो. वर्षभर मुंबईत नोकरी करणारे चाकरमानी १० दिवसांची सुट्टी काढून आर्वजून कोकणात जातात. बाप्पाची पूजा, आरती, भजन गातात. यादरम्यान काही मजेशीर गोष्टीदेखील घडतात. सोशल मीडियामुळे या वेळचे व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक गोड व्हिडीओ समोर आलेला आहे, जो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

सोशल मीडियावर यादरम्यानचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यावर लाखो व्ह्यूज आणि लाइक्सही मिळतात. ज्यात बऱ्याचदा चिमुकल्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. यात कधी ते गाणी गाताना दिसतात, तर कधी ते डान्स करताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक चिमुकला असं काहीतरी करतोय, जे पाहून नेटकऱ्यांनाही हसू आलं.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

अनेकांना झोप खूप प्रिय असते. पण, जेव्हा त्यांची झोप पूर्ण होत नाही, तेव्हा दिवसभर काम करता करता त्यांचा डोळा कुठे लागेल हे सांगता येत नाही. या व्हायरल व्हिडीओतील चिमुकल्यालादेखील रात्रीच्या भजनात झोप अनावर झाल्याचे दिसत आहे. यावेळी भजन सुरू असताना तो मध्येच झोपतो, त्यामुळे त्याला झोपेतून उठवण्यासाठी सर्व जण मोठमोठ्याने भजन सुरू करतात. यावेळी तो जागा होतो आणि सर्वांकडे पाहून टाळ्या वाजवतो. पण, त्यानंतर पुन्हा त्याला झोप अनावर होते आणि तो जागेवर पेंगायला सुरुवात करतो. पण, पेंगता पेंगता तो टाळ्या वाजवतो. या चिमुकल्याकडे पाहून बाजूला असलेले सर्व जण मोठमोठ्याने हसतात, तर काही जण व्हिडीओ शूट करतात. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.

हेही वाचा: नागोबा गेला बाप्पाच्या भेटीला; बत्तीस शिराळ्यातील VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @i_am_roshan01 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत १६ मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि आठ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. दरम्यान, यासारखे अनेक मजेशीर व्हिडीओ सध्या गणपतीनिमित्त सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.