Viral video: लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान…या लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्याभल्यांना पायातील घुंगराच्या तालावर नाचवलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी महाराष्ट्रातील लोकांचं मनोरंजन करत आली आहे. अलीकडच्या काळात लावणी देशातच नाही तर परदेशातही पोहोचली आहे. विदेशातील अनेक नृत्यांगणा महाराष्ट्रात येऊन लावणी शिकतात, तिचा अभ्यास करतात. काळानुसार लावणी बदलत गेली. समृद्ध होत गेली. अलीकडच्या काळात तर लावणी थेट डिजेवर सुद्धा वाजत आहे. अशाच काही कोरियन तरुणींची जबरदस्त लावणी सध्या व्हायरल होत आहे. या तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घालत आहे.
लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणून लावणी ही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर लावणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. घुंगरांचे बोल…ढोलकीचा ताल…घायाळ अदा आणि लोककलेचा डौलदार लहेजा मिरवत या चिमुकलीनं सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला आहे.
“कुठं कुठं जायचं हनिमूनला”’ या गाण्यावर या तरुणींनी ही भन्नाट अशी लावणी सादर केली आहे. यावेळी त्या फक्त लावणी करत नाहीयेत तर त्यांच्या चेहऱ्यावरच्या आदाही आपल्याला भुरळ घालत आहेत. लावणीच्या बोलाप्रमाणे या कोरियन तरुणी आपले हावभाव बदलत आहेत. “कुठं कुठं जायचं हनिमूनला” हे १९८० च्या ‘फटाकडी’ चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले, जगदीश खेबूडकर यांचे शब्द असलेले, आणि बाळ पळसुले यांचे संगीत असलेले एक प्रसिद्ध मराठी लावणी गीत आहे. या गाण्यात लोणावळा, खंडाळा आणि पन्हाळा यांसारख्या ठिकाणांची नावे येतात.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर raas.studio हीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि २२ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यावर नेटकरीही भरभरून कमेंट करत आहेत. यावेळी एका युजरने म्हंटलं, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रापार गेली. तर दुसऱ्या युजरने कमेंट केली “जबरदस्त लावणीचा ठसका”
