Kulhad Pizza Sehaj Arora Death Viral News: गुजरातमधील कुल्हड पिझ्झा कपलचा एक खाजगी व्हिडीओ व्हायरल झाल्याचं प्रकरण मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत होतं. हा खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याला ट्रोल करण्यात आलं . कुल्हड पिझ्झा कपल सेहज अरोरा आणि गुरप्रीत कौर यांचा खासगी व्हिडीओ कुणीतरी इंटरनेटवर शेअर केला. काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला यावर असंख्य अश्लील कमेंट्स सुद्धा होत्या. या एकूण प्रकरणानंतर कुल्हड पिझ्झा जोडीतला सेहज अरोरा याने आत्महत्या केल्याचे सांगणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.

कुल्हड पिझ्झा व्हायरल क्लिप प्रकरण काय?

जेव्हा कुल्हड पिझ्झामधील दोघांचा व्हिडीओ रिलीज झाला, त्या वेळी सेहजने इन्स्टाग्रामवर आपली बाजू सांगितली. तो म्हणाला की हा व्हिडिओ “पूर्णपणे बनावट” आणि “एआय जनरेट” आहे. त्याने पुढे दावा केला की काही आठवड्यांपूर्वी या जोडप्याला इन्स्टाग्रामवर वादग्रस्त व्हिडिओसह एक मेसेज आला होता आणि सदर व्यक्तीने “एआय-जनरेट” व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देत बदल्यात पैशाची मागणी केली होती. यानंतर अरोराने सदर प्रकरण मिटवावे म्हणून राजकीय दबाव सुद्धा सहन करावा लागत आहे असेही सांगितले होते यासंदर्भात त्याने स्वतःच्या फेसबुक पेजवर सुद्धा अनेक पोस्ट केल्या आहेत.

एकीकडे हे प्रकरण दिवसागणिक चिघळत असताना काही युट्युब पेजेसवर कुल्हड पिझ्झाच्या सेहजने आत्महत्या केल्याचे वृत्त शेअर होऊ लागलं. अखेरीस सेहजने स्वतः या सर्व व्हिडिओजची एक क्लिप बनवून आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे. सेक्स टेपच्या वादानंतर आता आत्महत्या केल्याचे सांगणारे वृत्त सुद्धा “बनावट” आहे असे त्याने लिहिले आहे.

दरम्यान, सेहजने पुढे म्हटले की, “या एकूण प्रकारानंतर दोन दिवसांपासून आम्हाला असंख्य कॉल येत आहेत. मुलाखती देण्याची सुद्धा माझ्यात आता शक्ती उरलेली नाही.” आमचं कुटुंब मानसिक तणावात आहे असं सांगत त्याने ट्रोलर्सना सुद्धा अशा खोट्या बातम्या पसरवू नका अशी विनंतीही त्याने केली आहे.

Story img Loader