Premium

कुल्हड पिझ्झाच्या सेहज अरोराने केली आत्महत्या? अंत्यसंस्काराच्या क्लिप झाल्या व्हायरल, पाहा खरी पोस्ट

Viral Video:कुल्हड पिझ्झा कपल सेहज अरोरा आणि गुरप्रीत कौर यांचा खासगी व्हिडीओ कुणीतरी इंटरनेटवर शेअर केला होता. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला यावर असंख्य अश्लील कमेंट्स सुद्धा होत्या

Kulhad Pizza Sehaj Arora Commits Suicide Says Viral News Team Gives Explanation After Viral Sex Clip Video Controversy
कुल्हड पिझ्झा व्हायरल क्लिप प्रकरण काय? (फोटो: फेसबुक/ Kulhad Pizza)

Kulhad Pizza Sehaj Arora Death Viral News: गुजरातमधील कुल्हड पिझ्झा कपलचा एक खाजगी व्हिडीओ व्हायरल झाल्याचं प्रकरण मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत होतं. हा खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याला ट्रोल करण्यात आलं . कुल्हड पिझ्झा कपल सेहज अरोरा आणि गुरप्रीत कौर यांचा खासगी व्हिडीओ कुणीतरी इंटरनेटवर शेअर केला. काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला यावर असंख्य अश्लील कमेंट्स सुद्धा होत्या. या एकूण प्रकरणानंतर कुल्हड पिझ्झा जोडीतला सेहज अरोरा याने आत्महत्या केल्याचे सांगणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुल्हड पिझ्झा व्हायरल क्लिप प्रकरण काय?

जेव्हा कुल्हड पिझ्झामधील दोघांचा व्हिडीओ रिलीज झाला, त्या वेळी सेहजने इन्स्टाग्रामवर आपली बाजू सांगितली. तो म्हणाला की हा व्हिडिओ “पूर्णपणे बनावट” आणि “एआय जनरेट” आहे. त्याने पुढे दावा केला की काही आठवड्यांपूर्वी या जोडप्याला इन्स्टाग्रामवर वादग्रस्त व्हिडिओसह एक मेसेज आला होता आणि सदर व्यक्तीने “एआय-जनरेट” व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देत बदल्यात पैशाची मागणी केली होती. यानंतर अरोराने सदर प्रकरण मिटवावे म्हणून राजकीय दबाव सुद्धा सहन करावा लागत आहे असेही सांगितले होते यासंदर्भात त्याने स्वतःच्या फेसबुक पेजवर सुद्धा अनेक पोस्ट केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kulhad pizza sehaj arora commits suicide says viral news team gives explanation after viral sex clip video controversy svs

First published on: 01-10-2023 at 16:38 IST
Next Story
Gandhi Jayanti 2023 : देशभरात कशी साजरी केला जाते गांधी जयंती? जाणून घ्या ‘या’ दिवसाचे महत्त्व आणि इतिहास