scorecardresearch

रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे ‘या’ व्यक्तीला पडले महागात; Viral Video पाहून तुम्हालाही धक्का बसेल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या लोभामुळे असं काही घडतं जे त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील.

labour video
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे अगदी खरेखुरे असतात. तर काही व्हिडीओ हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी बनवले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या लोभामुळे असं काही घडतं जे त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील.

व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, एक मजूर रस्त्याने चालताना दिसत आहे. तितक्यात त्याला रस्त्यावर पडलेले पैसे दिसले. पैसे दिसताच त्या मजुराने लालसेपोटी ते पैसे उचलले. खरं तर हा एक प्रँक होता. जेव्हा या व्यक्तीने खाली पडलेले पैसे उचलले तेव्हा बाजूला असलेल्या गोणीतून एक साप बाहेर आला, जो या व्यक्तीच्या अंगावर आला. खरं तर हा साप खोटा होता आणि प्रँकचा भाग होता. पण तो ज्यापद्धतीने अंगावर आला ते पाहून कोणीही घाबरून जाईल. साप अंगावर आल्याने हा मजूर असा काही घाबरला की तो खाली पडला आणि इकडे तिकडे उड्या मारू लागला.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: आईने मुलीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर जे घडलं ते पाहून थक्क व्हाल)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत भरपूर व्ह्यूज मिळाले असून लोक यावर वेगवेगळ्या कंमेंट करत आहेत. तसंच या व्हिडिओला अनेक लाईक्स देखील मिळाले आहेत. या व्हिडिओला अनेकजण शेअर देखील करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 12:41 IST