Ladies group dance: सोशल मीडियावर कायम अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुलांचे डान्स तर कधी मोठ्या मुलांचे डान्स. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. डान्सचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये कधी कोणी आपली डान्स कला दाखवत असते, तर कधी प्रोफेशनल डान्सर्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या एका ग्रुपचा भर पावसातला डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.
महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला वेळ काढून आवडीच्या गाण्यावर एखादी रील बनविताना दिसतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच काही महिला आहेत; ज्या मुसळधार पावसात डान्स करीत आहेत.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलांनी साडी नेसली असून, “झुंजूर मुंजूर पाऊस वाऱ्यानं अंग माझं ओलंचिंब झालं ” या गाण्यावर डान्स करीत आहेत. यावेळी त्या एकदम साध्या, सोप्या आणि सुंदर पद्धतीनं डान्स करीत आहेत. त्यांच्या साधेपणाचं सोशल मीडियावर युजर्स खूप कौतुक करीत आहेत. व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान अशाच काही हौशी महिलांचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साडी नेसून या महिलांनी भर पावसात भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
पाहा व्हिडीओ
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ hemalishedgemhatre नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एकानं यावर प्रतिक्रिया देत म्हंटलंय की, “नाद पाहिजे फक्त” शिवाय अनेक नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”महिलांनी तर राडा केला” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”जबरदस्त डान्स” तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”डान्स आवडला त्यांनी लाईक करा”अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
