Viral Video : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत लोक स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. त्यामुळे मानसिक ताण, थकवा आणि अस्वस्थता वाढताना दिसते. अशा परिस्थितीत नृत्य म्हणजेच डान्स हा आनंद आणि आरोग्य देणारा एक प्रभावी मार्ग ठरत आहे. मनसोक्त नाचल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच, पण मनावरचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होतो.पूर्वी नृत्य हे केवळ मनोरंजनासाठी किंवा कार्यक्रमांसाठी केले जात असे. मात्र आता अनेकजण डान्सकडे स्वतःला शोधण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवण्यासाठी गंभीरपणे पाहू लागले आहेत. डान्स शिकताना व्यक्ती स्वतःच्या भावनांना व्यक्त करू शकते आणि मन मोकळे करू शकते. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मन अधिक आनंदी राहते.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना डान्स करायला आवडतो. हल्ली अनेक जण डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही डान्स व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेक जण ट्रेंडिग रिल्सवर किंवा गाण्यावर व्हिडीओ बनवतात. लहान मुले, तरुण तरुणीबरोबर आता चाळीशी पन्नाशीतली माणसं सुद्धा आवडीने व्हिडीओ बनवतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुणींनी एका गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. हा व्हिडीओ गार्ड परिसरातील आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये ४ तरुणी डान्स करताना दिसत आहे. या चारही तरुणींनी साडी नेसली असून या धुमशान अंगात आलं या जुन्या मराठमोळ्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
being_kalakar5678 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” मराठी तडका” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हिरवी साडी नेसलेली ताई मला नेहमी आवडते. काकी, लय भारी. असाच आनंद घ्या आणि हसत रहा” तर एका युजरने लिहिलेय, “मराठी गाणं लय भारी” आणखी एका युजरने लिहिलेय, “बाईपण भारी देवा” एक युजर लिहितो, “आयुष्यामध्ये आनंद खूप महत्त्वाचा आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर चाळ आहे”
