Viral video: कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा ! कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात .शिमग्यात गावातील देवतांच्या पालख्या घरोघरी जातात. ग्रामस्थ या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करतात आणि आशीर्वाद घेतात. कोकणात सध्या शिमगा उत्सवाचे वेध लागले असून याच पार्श्वभूमीवर काही महिलांनी छान डान्सचं सादरीकरण केलं आहे. यांचा हा डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ५ महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. एवढचं नाहीतर या महिलांनी या गाण्यातील एकदम सेम टू सेम स्टेप्स केल्या आहेत. चाळीतल्या मोकळ्या जागेत त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे.संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत.
शिमगा आता आला आहे याचवरच या महिलांनी कोळणी नाचू निघाल्या शिमग्याची हावली या मराठी गाण्यावर डान्स केला आहे.महिला वर्ग म्हणजे सतत काही ना काही कामात व्यस्त असणारा वर्ग. घरातली कामं तर संपता संपत नाहीत. त्यात सणवार, पाहुणेरावळे, आजारपणं असं सगळं करताना आपली अगदी दमछाक होऊन जाते. मात्र या महिलांनी हे सगळं सांभाळून स्वत:लाही वेळ दिला आहे.
पाहा व्हिडीओ
maitri_cha_kattaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शिमगा”. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला तर मधली ताई आवडली” तर आणखी एका महिलेने “निळ्या साडीमधल्या काकी सरस आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
