VIRAL VIDEO : बाईकवर स्टंट करत मुलींना इम्प्रेस करायला गेला, मग पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

स्पोर्ट्स बाईकवर स्टंट करत मुलींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु मुलींनी इम्प्रेस करण्याच्या नादात त्याची स्वतःची फजिती झाली. हा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच.

ladka-ladki-ka-video-viral
(Photo: Twitter/ The Darwin Awards)

सोशल मीडियाचे जग मजेदार व्हिडीओंनी भरलेलं आहे. असे अनेक मजेदार व्हिडीओ इथे रोज पाहिले आणि अपलोड केले जातात. त्यातले काही व्हिडीओ इतके मजेदार असतात की ते शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागतात आणि मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका मुलाचा आहे, जो स्पोर्ट्स बाईकवर स्टंट करत मुलींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु मुलींनी इम्प्रेस करण्याच्या नादात त्याची स्वतःची फजिती झाली. हा मजेदार व्हिडीओ अवघ्या सत्तर हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि नेटिझन्सनाही तो आवडला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये अनेक लोक एकाच ठिकाणी स्पोर्ट्स बाईक घेऊन उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. इथे एखादी शर्यत होणार असल्याचा अंदाज येऊ लागतो. मग स्पोर्ट्स बाईकवर बसलेल्या मुलाकडे कॅमेरा झूम होऊ लागतो. मुलींना इम्प्रेस करण्यासाठी तो त्यांना जवळ बोलावतो आणि बसायला सांगतो. दोघेही बाईकवर बसताच तो स्टंट दाखवू लागतो. पण मग पुढे असं काही घडलं की ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल. तुम्ही बघू शकता की, स्टंट दाखवण्यासाठी त्या मुलाने बाईक चालवताच त्याचे नियंत्रण बिघडले आणि बाईक थेट जवळच उभ्या असलेल्या इतर बाईकवर जाऊन आदळली.

आणखी वाचा : दुबईमध्ये अवतरला ‘अलाद्दिन’! कधी पाण्यावरून तर कधी रस्त्यावरून जादुई चादरीवर बसून फिरतोय; VIRAL VIDEO पाहाच…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : फ्रिजखाली चिरडणार होता हा चिमुरडा.., एका ट्रेच्या मदतीने वाचवला जीव, VIRAL VIDEO मध्ये पाहा कसं ते…

The Darwin Awards नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये मोठ्या शायनिंगमध्ये स्टंट करायला गेलेल्या मुलाची फजिती पाहून लोकांना हसू आवरणं अवघड होऊ लागलंय. हा व्हिडीओ इतका मजेदार आहे की तो पुढे शेअर करून लोकांसोबत या व्हिडीओचा आनंद घेण्याचा मोह मात्र आवरता येत नाही. लोक या व्हिडीओचा आनंद घेताना दिसून येत आहेत. तसंच कधी कधी अति आत्मविश्वास सुद्धा आपल्याला अडचणीत आणतो अशा भावना लोक व्यक्त करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अबब ! एका बिअर कॅनमध्ये अडकला चार फूटाचा कोब्रा…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. आतापर्यंत या व्हिडीओला ७६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. एक हजार चारशेपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. मात्र, हा व्हिडीओ कुठचा आणि कधीचा आहे, याबाबत अद्यार कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ladka ladki ka video girls and boys funny video comedy video google trends today boy impressing girls with sports bike but became laughing stock video went viral on social media prp

ताज्या बातम्या