मोबाईल फोडून न जाणो काय दाखवत होता, पण पुढे जे घडलं ते पाहून हैराण व्हाल, पाहा हा VIRAL VIDEO

इतका खतरनाक प्रयोग तुम्ही याआधी कधीच पाहिला नसावा. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल.

Mobile-Blast-Viral-Video
(Photo: Instagram/ gieddeandgieddee )

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काही लोक काहीही करायला तयार असतात. अगदी आपला जीवही धोक्यात टाकतात. खतरनाक असे स्टंट करताना दिसतात. असा एक खतरनाक प्रयोग या व्हायरल व्हिडीओमधल्या मुलाने केला. इतका खतरनाक प्रयोग तुम्ही याआधी कधीच पाहिला नसावा. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा त्याच्या हातात मोबाईल पकडून उभा आहे, व्हिडीओमध्ये सुरूवातीला तो मोबाईल सुरू असल्याचं दाखवण्यासाठी स्क्रीन स्लाईड करताना दिसून येतोय. इतका चांगला मोबाईल स्वतःच्या हाताने फोडण्याची इच्छा कुणाची होणार नाही. पण या मुलाने ते करून दाखवलं. हा मोबाईल तो आधी एका मोठ्या दगडावर ठेवतो आणि मग पुढे तो जे करतो ते पाहून सर्वांचे डोळे विस्फारून जातील. दुसऱ्या आणखी एक दगडाने तो स्वतःचा नवा कोरा मोबाईल ठेचून काढतो. यात त्याच्या मोबाईलचा अक्षरशः चुराच होऊन जातो. मोबाईल तोडताना पाहून पाहणारे सारेच जण आश्चर्यचकीत होऊन जातात. पण यानंतर व्हिडीओमध्ये जे घडतं ते पाहून तर आणखी थक्क व्हाल. इतकंच काय तर तुमच्या मनात धडकी भरेल.

आणखी वाचा : Ratan Tata News: टाटा नॅनोमध्ये बसून VVIP ट्रिटमेंट न घेता रतन टाटा पोहोचले ताज हॉटेलला

ज्यावेळी हा मुलगा त्याचा मोबाईल दगडाने ठेचतो त्याचवेळी अचानक त्या मोबाईलमधून धुर येऊ लागतो. मोबईलमधून येणारा धूर इतका होता की बघता बघता मोबाईलने पेट घेतला. हे सर्व चित्र पाहून त्या ठिकाणी असलेले मुलं सुद्धा घाबरून दूर जाऊन उभी राहिली.

आणखी वाचा : शाळेच्या गेटवरच मुली आपआपसात भिडल्या, पार एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, फ्री स्टाईल हाणामारीचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : दबंग लेडी….एका हातात पिस्तुल, दुसऱ्या हातात काठी घेऊन फिरत होती, कारण ऐकून हैराण व्हाल!

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर giedde नावाच्या पेजवरून अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मनात धडकी भरवणारा असला तरी मोबाईलला आग लागल्यानंतर या व्हिडीओमधल्या मुलांच्या चेहऱ्यावरील भीती मात्र पाहण्यासारखी आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत याला हजारो लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट करण्यास सुरूवात केली आहे. अशाच एका यूजरने लिहिले की, हा चोरीला गेलेला फोन वाटतो, त्यामुळे तो फोडला असावा. चोरीचा मोबाईल असला तरी मी असं करणार नाही, असं देखील त्या यूजरने म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ladke ka video google trends today trending news omg story boy sudden started breaking his mobile but see what happened next in this prp

Next Story
लग्नात गिफ्ट मिळालेल्या इलेक्ट्रॉनिक टेडी बेअरचा स्फोट; वरासह त्याचा पुतण्या जखमी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी