Viral Video : मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये मिळणार आहे. विधानसभा निवडणुका जवळ येत आहे. सरकारने महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये देण्याची घोषणा केल्यामुळे महिला खरंच याच नेत्यांना पुन्हा निवडून आणणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. सोशल मीडियावर यावरून अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही लोक यावर अतिशय मजेशीर व्हिडीओ तयार करत आहे. (ladki bahin yojana : a girl said her mother does not listen to dad after taking his full salary and the government thinks she will listen to him for 1500 rupees funny video viral) सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली १५०० रुपये दिल्यानंतर सुद्धा महिला सरकारचं काहीच ऐकणार नाही, यामागील कारण सांगताना दिसते. ती चिमुकली काय सांगते, यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकली सांगते, "इथे आमची मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं काहीही ऐकत नाही.. आणि इथं सरकारला वाटतंय की १५०० रुपयांमध्ये त्यांचं ऐकेल. ना बाबा ना.. कठीण आहे." चिमुकलीचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हेही वाचा : Kolkata Rape Murder Case : “बलात्काऱ्यांना फाशी झालीच पाहिजे” विराट कोहलीची मागणी? ऐका खऱ्या Video तील वाक्य पाहा व्हायरल व्हिडीओ हेही वाचा : “…My wife is very strict” तरुणाने दुचाकीवर लिहिला मेसेज, Video पाहून पोट धरून हसाल queenkiyu30 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "लाडकी बहीण योजना" या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, "अरे बाळा बस कस….सरकारपर्यंत व्हिडिओ पोहचला तर…१५०० बंद होईल.." तर एका युजरने लिहिलेय, "अरे ती मुलगी शिकवलेला विनोद करते आहे तो विनोद म्हणून घ्या उगाच तिला शहाणपणा नका शिकवू…." आणखी एका युजरने लिहिलेय, "खरं बोलली बाळ" एक युजर लिहितो, "अग ताई अशाने १५००/- बंद होईल. लाडकी बहिण योजना" या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.