मोठ्या स्टाईलमध्ये बाईक स्टार्ट करू लागली… मग पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही ! पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ एका मुलीचा आहे. यात ती बाईक स्टार्ट करताना असं काही करताना दिसून येतेय, ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल. हा व्हिडीओ काही वेळातच हजारो लोकांनी पाहिलाय आणि शेकडो लोकांनी याला लाईक सुद्धा केलं आहे.

girls-bike-viral-video
(Photo: Ywitter/ Viral_GIFs)

सोशल मीडियाचं जग लाखो करोडो व्हिडीओंनी भरलेलं असतं. प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने व्हायरल व्हिडीओ पाहिले जातात आणि अपलोड सुद्धा होत असतात. त्यात आता आणखी एका विनोदी व्हिडीओची भर पडलीय. हा व्हिडीओ एका मुलीचा आहे. यात ती बाईक स्टार्ट करताना असं काही करताना दिसून येतेय, ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल. हा व्हिडीओ काही वेळातच हजारो लोकांनी पाहिलाय आणि शेकडो लोकांनी याला लाईक सुद्धा केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या १८ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये हेल्मेट घातलेली एक मुलगी बाईकवर बसून ती स्टार्ट करत असल्याचं दिसत आहे. अनेक प्रयत्न करूनही बाईक स्टार्ट होत नाही, मग ती गियर फिक्स करते. पण यात बाईक गिअरमधून बाहेर येण्याऐवजी गिअरमध्ये येते. यानंतर मुलगी पुन्हा बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न करते. पण त्यानंतर पुढे जे चित्र दिसून येतं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. तर पाहूया काय आहे त्या व्हिडीओमध्ये…

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरीबाईचा अनोखा स्वॅग, तोंडात ५०० रूपयाची नोट धरून केला बेफाम डान्स

आणखी वाचा : MBBS डॉक्टरने शेण खाल्लं…म्हणतो यात व्हिटॅमिन असतं! पाहा हा VIRAL VIDEO

या मुलीने मोठ्या स्टाईलमध्ये बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला खरा, पण बाईक गिअरमध्ये असल्याने मुलीचा ताबा सुटला आणि बाईक स्टार्ट होताच गोल गोल घिरट्या घालून मग पुढे जाऊन थेट एका दुकानाला धडकली. यात तरूणीने स्वतःला कसं बसं सावरलं आणि दुकानाच्या शटरला पकडत उभं राहण्याचा प्रयत्न केला.

ही घटना नेमकी कुठे घडलीय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र @Viral_GIFs नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ही संपूर्ण घटना रस्त्यावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. यातील तरूणीची बाईक स्टार्ट करण्याची पद्धत पाहून सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यावाचून रहावत नाही. हा व्हिडीओ पाहणारे पोट धरून हसत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ladki ka video girl funny video viral video google trends today girl wear helmet and starting bike then what happened will wont stop laughing watch this funny video prp

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या