mumbai local viral video : मुंबई लोकल मुंबईकरांच्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कधी लोकल वेळेवर न आल्यामुळे, तर कधी बसायला जागा न नसल्यामुळे प्रवाशांमध्ये वाद होतात. मात्र, सध्या सर्वत्र सगळीकडे गणेशउत्सवाचा उत्साह आणि आनंदाने पाहायला मिळत आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणी बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले आहे. याचदरम्यान गणेशोत्सवाची ही आनंदमयी वाईब चक्क मुंबई लोकलमध्येही पाहायला मिळाली आहे. मुंबई लोकलमध्ये काही प्रवासी मिळून जल्लोषात आनंद साजरा करताना दिसत आहेत.

मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असतानाच अचानक ‘पालखी निघाली राजाची! या हो गणेश नगरात, लालबागचा राजा, माझा बसलाय नटून थाटात’ या गाण्याची पिपाणीवर म्युजिक (धून) वाजू लागते. त्यानंतर लोकलच्या डब्यात उभे असलेले प्रवासीही उत्साहात सहभागी होतात. काही जण हात वर करून, तर काही जण चक्क उड्या मारत नाचू लागतात. काही मोजकी माणसे सोडल्यास काही फक्त उभं राहून, मान डोलावून या म्युजिकचा आनंद घेताना दिसतात.

‘एकदा तरी या डब्यात चढायला भेटलं पाहिजे’ (Viral Video)

प्रत्येक उत्सव आणि सेलिब्रेशन मुंबई लोकलमध्ये अनेकदा अनोख्या पद्धतीने साजरे होताना दिसते. त्यामुळे सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असताना, त्याची झलक मुंबई लोकलमध्येही पाहायला मिळाली. पाहता पाहता लालबागच्या राज्याचं गाणं लागताच संपूर्ण डब्यात गणेशोत्सवाचा जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कारण – गणेशोत्सवात या गाण्याशिवाय लालबागचा राजाची मिरवणूक अपूर्ण मानली जाते. एकदा बघाच हा व्हायरल होणारा व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @dholpremi_sandy_5jan_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून ‘आम्ही गणराय वाले’, ‘हा कालचा व्हिडीओ आहे आम्ही पण होतो बाजूला’, ‘एकदा तरी या डब्यात चढायला भेटलं पाहिजे’, ‘लालबागचा राजाच्या विजय असो’, ‘एकच नंबर ना’, ‘जबरदस्त’, ‘वाईब’, ‘म्हणून लेडीज, लेडीज डब्यात न चढता सेकंड क्लासमध्ये चढतात… अशी मस्ती मजा करून आनंद लुटायला’, ‘एकच नंबर! तो गणपती नाचतानाचा व्हिडीओ आठवला’, ‘म्हणून मला मुंबई आवडते’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.