Premium

देवाच्या दारात भेदभाव? लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत सेलिब्रिटींना VVIP दर्शन अन् सामान्यांना धक्काबुक्की; Video Viral

एकीकडे सर्वसामान्य भाविकांची गैरसोय होत असताना दुसरीकडे व्हीव्हीआयपींना बाप्पाजवळ उभं राहून दर्शन घेण्याची संधी दिली जात आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

lalbagh raja celebs are getting vvip treatment common people are being mistreated
सेलिब्रिटी आणि सामान्यांमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भेदभाव का? (फोटो – ट्विटर,AdvAshutoshBJP) )

देशात तसेच महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागमध्ये राजाच्या दर्शनासाठी भाविक सातत्याने येत असतात. मात्र, आता या गणेशोत्सवात व्हीव्हीआयपी सेलिब्रिटींना दिली जाणारी वागणूक आणि सर्वसामान्य भाविकांशी होणारे गैरवर्तन यामुळे लोक संतप्त झाले आहेत. एकीकडे सर्वसामान्य भाविकांची गैरसोय होत असताना दुसरीकडे व्हीव्हीआयपी सेलिब्रिटींना बाप्पाजवळ उभं राहून दर्शन घेण्याची संधी दिली जात आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाविकांना धक्काबुक्की आणि गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये गणेशोत्सवाशी संबंधित अधिकारी भक्तांना धक्काबुक्की करताना दिसत होते. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भक्तांना बाप्पापासून दूर ढकलण्यात आले आहे. अधिकारीही भाविकांशी गैरवर्तन आणि धक्काबुक्की करताना दिसले. दुसरीकडे, व्हीव्हीआयपी सेलिब्रिटींना आरामात बाप्पाजवळ उभे आहेत, दर्शन घेत आहेत आणि फोटो काढत आहेत.

हेही वाचा -ॲपल वॉचच्या नादात शौचलयात अडकली महिला! नंतर करू लागली आरडा-ओरडा; संपूर्ण प्रकरण वाचून तुम्हीही डोकं धराल

सेलिब्रिटींना व्हीव्हीआयपी दर्शन मिळत आहे
आणखी एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अभिनेत्री शिल्पा शेट्टी बाप्पाच्या दर्शनासाठी आली आहे, ती तेथे बराच वेळ तिथे थांबली होती पण तिच्या शेजारी दर्शनासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांना दूर ढकलले जात आहे. आता हे व्हिडिओ शेअर करून लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सुरू असलेल्या व्हीव्हीआयपी संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

व्हीव्हीआयपी सेलेब्स आणि सामान्य भक्तांमध्ये उभारली भिंत
बाप्पाचा एक पाय व्हीव्हीआयपींसाठी तर दुसरा पाय सर्वसामान्यांसाठी ठेवण्यात आल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे, दोन्ही पायांच्यामध्ये रेलिंग लावण्यात आली आहे, जी सर्वसामान्य आणि व्हीव्हीआयपी भक्तांमध्ये भिंत आहे. आरामात दर्शन घेणारे ‘व्हीव्हीआयपी’ आणि धक्काबुक्कीनंतर दर्शन घेणारे सामान्य भाविक अशी विभागणी ही भिंत करते. त्याचवेळी मोठा व्हीव्हीआयपी व्यक्ती आल्यावर सर्वसामान्य भाविकांचे दर्शनही बंद केले जाते.

हेही वाचा – गौराई आली सोन्याच्या पावली! भाजी विकणाऱ्या जुळ्या बहिणींना बनवले सुंदर गौरी; पाहा Viral Video

मात्र, लालबागच्या राजाच्या मंडळाची ही स्थिती दरवर्षी तशीच राहते, कधी भाविकांशी गैरवर्तन होते, कधी अधिकारी आणि पोलिसांमध्ये धक्काबुकी होते, पत्रकारांना मारहाण होते. मात्र आता सोशल मीडियावर भक्तांशी होत असलेल्या गैरवर्तनाबद्दल लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lalbagh raja celebs are getting vvip treatment common people are being mistreated snk

First published on: 25-09-2023 at 19:15 IST
Next Story
चक्क धावत्या मेट्रोमध्ये आजोबांनी बिडी पेटवली अन्…, VIRAL व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया…