Lalbaugcha raja 20 kg gold crown: ‘लालबागचा राजा’चे बुधवारी दिनांक १८ सप्टेंबरला सकाळी गिरगाव चौपाटीवर विसर्जन झाले. तमाम मुंबईकर आणि देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या राजाला भावपूर्ण निरोप दिला. लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी अनंत अंबानीही यावेळी उपस्थित होते. लालबागचा राजा गणेश मंडळात प्रमुख सल्लागार पदावर ते आहेत. दरवर्षी लालबागचा राजाच्या विसर्जनाला लाखो गणेशभक्त हजेरी लावत असतात. गिरगाव चौपाटीवर तर लाखोंच्या संख्येने एक झलक पाहायला मिळावी म्हणून लोक आधीपासून उपस्थित होते. दरम्यान, अंबानी कुटुंबीयांनी लालबागच्या राजाला २० किलो सोन्याचा मुकुट भेट दिला होता. त्या मुकुटाचं काय झालं माहितीये का? राजाच्या विसर्जनावेळचा एक व्हिडीओ समोर आला आहे, यावेळी मुकुटाचं काय केलं पाहा.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विश्वस्तपदी नियुक्ती झालेल्या अनंत अंबानी यांनी राजाला सोन्याचा मुकूट भेट दिला आहे. या मुकुटाचं वजन २० किलो एवढं आहे, तर किंमत १५ कोटी रुपये आहे. हा मुकूट राजाच्या डोक्यावर गणेशोत्सवात पाहायला मिळाला, तसेच विसर्जन मिरवणुकीतही हा मुकूट दिसला. मात्र, राजाचं समुद्रात विसर्जन करण्यापूर्वी लालबागचा राजा गणपतीचा सोन्याचा मुकूट काढून घेण्यात आला. गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा आल्यानंतर बाप्पाची आरती करून लालबागच्या राजानं आपल्या अंगावर परिधान केलेले दाग-दागिनेही मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून उतरवण्यात आले.
अनंत अंबानींनी दान केलेल्या १५ कोटींच्या मुकुटाचे काय झाले?
यावेळी व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुकुटाचे भाग वेगवेगळे केले जात असल्याचं दिसत आहे. कार्यकर्ते हे मुकूट वेगवेगळ्या भागात काढत आहेत. हे मुकूट काढल्यानंतर मग लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. विशेष म्हणजे अनंत अंबानीही विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर उपस्थित होते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> घरात मुलगी असणाऱ्या प्रत्येकानं पाहावा असा VIDEO; आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून डोळ्यांत येईल पाणी
सोशल मीडियावर हा व्हिडीओ varindertchawla नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बाप्पाचं खोल समुद्रात विसर्जन झाल्यानंतर तराफ्याचे नटबोल्ट काढण्यासाठी सहा ते सात स्कुबा डायव्हरदेखील खोल समुद्रात पाठवण्यात आले. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत ‘लालबागचा राजा’ला निरोप देण्यात आला आहे.