Lalbaugcha Raja Auction 2024 Video : मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती अशी लालबागचा राजाची ओळख आहे. त्यामुळे मुंबईसह देशभरातून आणि परदेशातूनही भक्त लालबागचा राजाच्या दर्शनासाठी येतात. गणेश चतुर्थीपासून पुढील १० दिवस राजाच्या दरबारी लाखो भाविक दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे असतात. अनेक जण लालबागचा राजाच्या चरणी नवस फेडण्यासाठी येतात, त्यामुळे नवस आणि वस्तू स्वरूपात दरवर्षी लालबागचा राजाच्या चरणी भरभरून दान दिलं जातं. यात हे वर्षही अपवाद नाही.

यंदा दहा दिवसांमध्ये लालबागचा राजाच्या चरणी कोट्यावधी रुपयांचे दागिने, भेटवस्तू दान स्वरूपात आल्या, याच दान स्वरूपात आलेल्या वस्तूंचा नुकताच लिलाव करण्यात आला, ज्यात एका एक हजार रुपयांच्या क्रिकेटच्या बॅटचा समावेश होता. लालबागचा राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या याच क्रिकेट बॅटला लिलावात अशी काही बोली लागली की किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. दरम्यान, या लिलावाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक हजार रुपयांच्या क्रिकेट बॅटला किती रुपयांची बोली लागली जाणून घेऊ…

लालबागचा राजाच्या गणपतीच्या स्थळी पार पडला लिलाव (Lalbaugcha Raja Auction 2024)

लालबागचा राजाविषयी भक्तांमध्ये एक वेगळं आकर्षण आहे. हजारो भाविक श्रद्धा म्हणून लाख मोलाच्या किमतीचे दागिने, मूर्त्या आणि अनेक वस्तू भेट देतात. यात दागिन्यांचा आणि वस्तूंचा लालबागचा राजाच्या गणपतीच्या स्थळी नुकताच लिलाव पार पडला. या लिलावात राजाच्या चरणी अर्पण झालेली क्रिकेटची बॅट मंडळाच्या वतीने एक हजार रुपये किमतीने ठेवण्यात आली होती. यावेळी लिलावात या बॅटसाठी दोन हजार रुपयांपासून बोलीला सुरुवात झाली, त्यानंतर ही बोली पाच हजार, सहा हजार रुपयांवरून थेट ११ हजार रुपयांवर जाऊन पोहोचली आणि अखेर १२ हजार रुपयांवर ही बोली संपणार असे वाटतच होते, पण कोणीतरी मधूनच १५ हजार रुपयांची बोली लावतो. शेवटी एक हजार रुपयांची बॅट लिलावात १५ हजारांना कोणीतरी व्यक्ती खरेदी करतो.

१००० रुपयांच्या बॅटवर किती रुपयांची बोली पाहा (Lalbaugcha Raja Auction Live Video)

Read More Trending News : “बाईSS… काय हा प्रकार”; भरट्रॅफिकमध्ये तरुणीनं केलेलं कृत्य पाहून नेटकरी चक्रावले; VIDEO पाहून तुम्हीही माराल कपाळावर हात

अशाप्रकारे लालबागचा राजाच्या चरणी अर्पण झालेल्या अनेक लहान-मोठ्या वस्तूंचा लिलाव केला जातो, ज्यात अनेक जण राजाची आठवण म्हणून यातील वस्तू लिलावातून खरेदी करतात.

यंदा लालबागचा राजाच्या चरणी अर्पण झालेल्या वस्तू आणि किमतींविषयी सांगायचे झाल्यास, दान म्हणून ५.६५ कोटी रुपये रोख, ४.१५ किलो सोनं आणि ६४.३२ किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे. यातील अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव नुकताच पार पडला, ज्यात दोन कोटी ३५ लाख १८ हजार रुपयांची विक्रमी विक्री झाली.

Story img Loader