Lalu prasad yadav said first time after kidney transplant i am feeling better now gps 97 | Loksatta

Video: मुलीकडून किडनी मिळल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचा पहिला व्हिडिओ आला समोर; म्हणाले “मला चांगलं…”

मुलीकडून किडनी मिळाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा पाहिला व्हिडिओ समोर आला आहे

Video: मुलीकडून किडनी मिळल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचा पहिला व्हिडिओ आला समोर; म्हणाले “मला चांगलं…”
photo(social media)

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर सोमवारी सिंगापूर येथील रुग्णालयात यशस्वीरित्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांचे समर्थक, चाहते आणि कार्यकर्ते त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. मुलगी रोहिणी आचार्य हिने दान केलेल्या किडनीचे प्रत्यारोपण केल्यानंतर मंगळवारी स्वतः लालू यादव यांनी आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली, ते म्हणाले “मला आता बरं वाटत आहे”. लालू यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत लोक त्यांचा हा व्हिडिओ बघून खूप खुश होत आहेत.

किडनी शस्त्रक्रियेनंतर ११ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये लालू यादव पहिल्यांदाच “तुम्ही सर्वांनी प्रार्थना केलात, आता मला बरं वाटत आहे” असं म्हणाले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर लालू यादव यांचा हा पहिलाच व्हिडीओ आहे ज्यामध्ये ते बोलताना दिसत आहेत.

( हे ही वाचा: भंगारात गेलेल्या स्कुटरची अनोखी कमाल! देसी जुगाड पाहून आनंद महिंद्रा म्हणाले ” मला…”)

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: चोरांचा जीवाशी खेळ! बिहारमध्ये चालत्या ट्रेनमधून केली तेलाची चोरी; Viral व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का)

लालूंची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य हिने तिची एक किडनी वडिलांना दान केली. लालू आणि रोहिणी यांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर लालूंना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. लालू यांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांचे चाहते खुश झाले आहेत. अनेकजण त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 12:24 IST
Next Story
आधी निषेध मग लग्न! खराब रस्त्याला कंटाळलेला नवरदेव लग्न सोडून थेट आंदोलनात पोहचला