Shocking video: अपघाताचे तसे तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील, पण हा एक असा व्हिडीओ आहे, जो पाहिल्यावर तुम्हाला धडकी भरेल. ड्रायव्हिंग करता करता रस्त्यात असं काही घडलं की तुमच्या अंगावर काटा येईल. २५ सेकंदांचा हा व्हिडीओ आहे, ज्यातील पाच सेकंद भयंकर आहेत. असं नेमकं काय घडलं ते पाहूयात.

निसर्गापुढे माणूस तोकडाच

Train Couple Intimate
हा तर निर्लज्जपणाचा कळस! धावत्या ट्रेनमध्ये कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की..; VIDEO व्हायरल
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Shocking Video car Driver Cross bridge On taking risk and Without Support
“घाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप करायलाही वेळ देत नाही” ८ सेकंदचा VIDEO पाहून अंगावर काटा येईल; काय घडलं?
Brave Woman Fights Off Around 15 Stray Dogs With Slipper In Hyderabad shocking video
VIDEO : भयंकर! जमिनीवर पाडले, लचके तोडले; ती किंचाळत राहिली अन्…मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर १५ कुत्र्यांचा हल्ला
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…

माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्‍व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होते. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो. तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. उत्तराखंडमधील एका घाटामध्ये अचानक झालेल्या भूस्खलनामुळे मोठी हानी झालीय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं धस्स होईल.

भूकंप, त्सुनामी, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक घटना अचानक घडतात. या नैसर्गिक घटनांमुळे किती लोकांना जीव गमवावा लागतो हे तुम्ही पाहिलेच असेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घाटात एक वाहनचालक गाडी चालवत आहे. त्याच्यापुढे आणखी काही गाड्या दिसत आहेत. थोडं पुढे गेल्यानंतर एक बोगदा येतो आणि तो बोगदा पार केल्यानंतर थोडं पुढे जाताच डोंगरावरून मोठ मोठे खडक, माती, दगड खाली कोसळू लागतात. हे पाहून हा चालक आपली गाडी तशीच रिव्हर्समध्ये मागे घेऊन जातो. तो उलट्याच दिशेने गाडी चालवून स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, कारण हळूहळू डोंगराचा सगळाच भाग खाली कोसळताना दिसत आहे. थोड्याशा हुशारीने आणि येणारा धोका ओळखून चालकाने योग्य निर्णय घेत या संकटातून स्वत:बरोबरच इतरांनाही वाचवलं. अवघ्या १० फुटांवर आलेल्या मृत्यूला चकवा देऊन हा चालक माघारी फिरला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral Video: भयंकर! बेडवर झोपण्यासाठी गेली व्यक्ती; विचित्र आवाज आल्याने गादी उचलताच बसला धक्का

यापूर्वी या घाटात अशा प्रकारचे अपघात झाले आहेत, त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या व्हिडीओवर अनेक जण संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत.