Monkey emotional viral video: प्राण्यांना भावना नसतात, असं म्हटलं जातं. मात्र माकडाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्राण्यांनाही भावना असतात, याची प्रचिती येते.आपल्या निकटवर्तींयांना गमावल्याचे दु:ख केवळ माणसांनाचा नाही तर मुक्या प्राण्यांनाही होते. कधीकधी या मुक्या प्राण्यांच्या शोक हृदय हेलावणारा असतो. असाच एक भावूक करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये आपल्या मालकाच्या मृत्यूनंतर एका माकडानं काय केलं पाहा. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.
झारखंडच्या देवघरमधील एका हृदयस्पर्शी क्षणाने देशभरातील लोकांचे मन जिंकले, कारण एका माकडानं आपल्या मालकाच्या म्हणजेच एवढे दिवस ज्यानं त्याला खायला दिलं त्याच्या अंत्यसंस्कारात श्रद्धांजली वाहिली. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका माणसाच्या अंत्यसंस्कारात माकड सहभागी होताना आणि त्याच्याबद्दल आदर व्यक्त करताना दिसत आहे, ज्यामुळे सर्वांना मानव आणि प्राण्यांमधील मजबूत बंधनाची आठवण होते.
मुन्ना सिंग नावाचा हा माणूस त्याच्या गावात प्राण्यांबद्दल, विशेषतः माकडांबद्दल प्रेम आणि काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध होता. स्थानिकांनी सांगितले की तो अनेकदा त्यांना खायला प्यायला देत असे. दरम्यान सिंग यांचे निधन झाल्यावर आणि त्यांचे शरीर अंत्यसंस्कारासाठी जमिनीवर ठेवण्यात आले तेव्हा, हे माकड त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला. तो सिंग यांच्या पार्थिवाच्या शेजारी बसला आणि दुःख आणि कळकळ व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा त्याचे पार्थिव त्याच्या घराबाहेर लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले तेव्हा हे माकड आलं. यावेळी हे माकड हळूवारपणे त्या व्यक्तीचं चुंबन घेत आहे आणि नंतर त्याच्या शेजारी बसून राहिल्याचं दिसत आहे. त्या शांत आणि हृदयस्पर्शी दृश्याने अनेक गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. तो प्राणी अंत्ययात्रेत सामील झाला आणि लोक भावूक झाले. आदर म्हणून, अनेक गावकरी माकडापुढे नतमस्तक झाले.
पाहा व्हिडीओ
व्हिडिओ व्हायरल होताच प्रतिक्रिया
या हृदयस्पर्शी दृश्याचा व्हिडिओ ऑनलाइन वेगाने व्हायरल होत आहे. हजारो लोक माकडाच्या कृतीने प्रभावित झाले आणि त्यांनी प्राणी आणि माणसामधील भावनिक बंधनाचे कौतुक केले.”हे चित्र मृत व्यक्तीचं माकडाशी असलेल्या नात्याबद्दल बरेच काही सांगते. या व्यक्तीने माकडाची काळजी घेतली असेल. हा त्याचा शेवटचा निरोप आहे,” एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली. “जय बजरंगबली,” ही घटना आठवण करून देते की दयाळूपणा कधीही दुर्लक्षित होत नाही—अगदी प्राण्यांकडूनही.