“हवा तेज चलता है, दिनकर राव टोपी संभालो…” हा ‘अग्निपथ’ चित्रपटातील संवाद हिंदी चित्रपटसृष्टीमधील अजरामर संवादांपैकी एक आहे. कोणीही यशाने हुरळून न जाता सावध वाटचाल करावी असा संदेश देणारं हे वाक्य आजही अमिताभ बच्चन यांच्या सर्वोत्तम संवादांपैकी एक आहे. ज्याप्रमाणे या चित्रपटामध्ये दिनकर रावला (गोगा कपूर यांनी ही भूमिका साकारलेली) टोपी संभाळण्याचा सल्ला अमिताभ यांनी दिला, तसाच एखादा सल्ला एक व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही पंतप्रधानांना द्यावा वाटेल. कारण या पंतप्रधानांच्या हातातील छत्री अशी काही उलटली की चारचौघात त्यांनी स्वत:चं हसं करुन घेतलं आणि त्यानंतर आता सारं त्यांच्यावर हसतंय. हे सारं घडलंय ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासोबत.

नक्की काय झालं?

लॉरा बॅसेट (Laura Bassett) या फ्रीलान्स राजकीय लेखक आणि स्तंभलेखिका आहेत. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा मज्जेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. ‘ही व्यक्ती युनायटेड किंग्डमची पंतप्रधान असूच शकत नाही’ अशा कॅप्शनसह त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मोकळ्या मैदानावर एक सार्वजनिक कार्यक्रम सुरु असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पाऊस सुरु झाल्यावर पंतप्रधान जॉन्सन यांनी आपल्याकडे असलेली छत्री उघडण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यांच्याकडून ही छत्रीही काही पटकन उघडली गेली नाही. थोडा वेळ प्रयत्न करून अखेरीस छत्री उघडण्यात त्यांना यश मिळत. पण छत्री उघडल्यावर काही क्षणातचं त्यांना लक्षात आलं की आपल्या बाजूच्या महिलेला छत्री द्यायला हवी हे लक्षात आलं. जॉन्सन यांनी लगेच आपली छत्री त्या महिलेला ऑफर केली आणि त्या महिलेने नको असं सांगयला आणि त्यांची छत्री बंद व्हायला एकच वेळ झाली. पुढे पुन्हा छत्री उघडताना छत्रीचं उलटी झाली आणि पाठी उपस्थितांमध्ये एकचं हशा पिकला. व्हिडीओ संपता संपता त्यांनी उलटी झालेली छत्री सरळ करण्याचा प्रयत्न केला.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
loksatta analysis survey in britain predict uk pm rishi sunak s seat at risk
विश्लेषण: ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांचे पद धोक्यात? ताज्या निवडणूक सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय?

व्हिडीओवर मज्जेशीर कमेंट्स

अवघ्या ३४ सेकंदाचा हा व्हिडीओ आत्तापर्यंत ७.४ दशलक्ष लोकांनी बघितला आहे. त्यावर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. कमेंट्समध्ये युजर्सनी विनोदी जिफ्सही कमेंट केल्या आहेत. एका युजरने ‘मला ब्रिटीश कॉमेडियन आवडतात.’ अशी कमेंट केली तर दुसऱ्या युजरने ‘मी यूके सोडण्यामागचं एक कारण म्हणजे हे आहेत.’ अशी थेट कमेंट केली. एक युजरने तर  जॉन्सन यांची तुलना मिस्टर बीन यांच्याशी केली.

तुमचं काय मत आहे या व्हिडीओवर?