बेटर डॉट कॉमचे (Better.com) मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गर्ग यांच्याविरोधात कंपनीतील माजी कर्मचाऱ्याने खटला दाखल केला आहे. विशाल गर्ग यांच्यावर गुंतवणूकदारांना कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप आहे. बेटर डॉट कॉमच्या माजी कार्यकारी उपाध्यक्ष साराह पियर्स यांनी हा खटला दाखल केला आहे.

साराह पियर्स यांनी दाखल केलेल्या खटल्यात म्हटलं आहे, “विशाल गर्ग यांनी जारी केलेल्या निवेदनात बेटर डॉट कॉमचं स्पॅकमध्ये (SPAC) विलिनीकरण कंपनीच्या आर्थिक स्थितीमुळे होत असल्याचं कारण लपवण्यात आलं. तसेच निवेदनातून गुंतवणूकदारांना खोटं आश्वासन देण्यात आलं.” या आरोपांवर बेटर डॉट कॉमच्या वकिलांनी प्रतिक्रिया देत आरोप फेटाळले आहेत. तसेच हे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला.

wardha lok sabha constituency, Amar Kale, sharad pawar ncp, amra kale campaign, Faces Setback , Complaints of Financial Mismanagement, amar kale not spending money, finance in campaign,
वर्धा : ‘हवेत राहू नका ‘, अमर काळे यांना सहकाऱ्यांचा इशारा
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
Dilip Ghosh comments on Mamata TMC
दिलीप घोष यांच्या ममतांवरील स्त्रीद्वेष्टा टिप्पणीनंतर बंगालच्या राजकारणात वादळ, टीएमसीची थेट निवडणूक आयोगाकडे धाव
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!

बेटर डॉट कॉम स्पेशल परपज अक्विझिशन कंपनीत (SPAC) विलिनीकरण करत आहे. हा व्यवहार ७.६ बिलियन डॉलर किंमतीचा आहे. मागील वर्षी सुरू झालेली ही विलिनीकरणाची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. हा निर्णय मागील वर्षी चांगलाच चर्चेत होता.

हेही वाचा : तीन मिनिटांच्या Zoom Call मध्ये ९०० जणांना कामावरुन काढणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या सीईओची संपत्ती किती माहितीय का?

अमेरिकेतील न्यू यार्कच्या जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत याचिकाकर्त्या साराह पियर्स म्हणाल्या, “मी बेटर डॉट कॉम आणि स्पॅकच्या व्यवहाराबाबत काळजी व्यक्त केल्यानंतर मला फेब्रुवारी २०२२ मध्ये माझ्या पदावरून काढून टाकण्यात आलं.” यानंतर साराहने आपल्या याचिकेत आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केली आहे.