लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील सर्वांसाठी पर्वणीचा दिवस असतो. रविवारी प्रदोषकाळ सायंकाळी. ६.०५ पासून रात्री ८.३६ पर्यंत आहे. या काळात शुभ अमृत हे दोन योग आहेत त्यानंतर सायंकाळी ७.१० पासून वृषभ स्थिर लग्न असल्यामुळे हा काळ देखील पूजेसाठी शुभ असणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाल दिसल्यास कुंकू, अक्षता वाहून तिची पूजा केल्याने भरभराटी मिळते असा देखील समज आहे. दिवाळीच्या दिवशी सकाळी महालक्ष्मी मंदिरात वस्त्र चढवून सुवासिक उदबत्ती लावली जाते. लक्ष्मी पूजनात नऊ गोमती चक्र ठेवून नंतर ते तिजोरीत ठेवल्याने भरभराट होते, असा देखील समज आहे. त्यामुळे ही परंपराही काही भागात दिसून येते. लक्ष्मी पूजन करताना चण्याची डाळ देवी लक्ष्मीवर वाहून पूजा झाल्यावर ही डाळ पिंपळाच्या झाडाला चढवली जाते. सकाळी ९.३० ते ११.०० (लाभ) सकाळी ११.०० ते ११.३० (अमृत) दुपारी २.०० ते ३.३० (शुभ) सायंकाळी ६.३० ते ८.०० (शुभ) रात्री ८.०० ते ९.१५ (अमृत) असे लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त आहेत.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वहीचे पूजन देखील करण्याची परंपरा आहे. रविवार ३० ऑक्टोबरला सायंकाळी ६.०५ ते रात्री ९.४० वही पूजनासाठी शुभ अ‍मृत योग आहे. लक्ष्मीची पूजा करताना, आवाहन व प्रतिष्ठापना विधीच्या पार्श्वभूमीवर हातात अक्षता घेऊन ॐ महालक्ष्‍मी देवी! सिद्धी बुद्धीसहीत प्रतिष्ठीत हो. या मंत्राचा जप केला जातो.

तिन्ही देवांचे स्वामी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाने सुरू केलेल्या सर्व कार्यात आम्हाला सिद्धी मिळू दे.’ यासाठी मंत्र पठण केले जाते, तसेच श्री गणेश पूजनही केले जाते. संबंधित बातमीमध्ये ज्या रुढी परंपरा जोपासल्या जातात  त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.