सध्या संपूर्ण देशात नवरात्री साजरी केली जात आहे. मग यामध्ये क्रिकेटर्स कसे मागे राहतील? वीरेंद्र सेहवागसह अदानी स्पोर्टलाइनच्या गुजरात जायंट्स संघाने शनिवारी लीजेंड्स लीग क्रिकेटनंतर जोधपूरमध्ये नवरात्री साजरी केली. सर्व क्रिकेटपटूंनी यावेळी गरबा नाईटमध्ये सहभाग घेतला. यावेळी सर्वांनी पारंपारिक पोशाख परिधान करून गरब्याचा आनंद लुटला.

या दरम्यान, ख्रिस गेलने मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. आपल्या मनमौजी अंदाजासाठी प्रसिद्ध असणारा गेल कुर्ता पायजमा घालून तीन मुलींसह गरबा खेळताना दिसला. गुजरात जायंट्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. गेलला या पारंपरिक पोशाखात गरबा खेळताना पाहून चाहतेही खुश झाले आहेत. ख्रिस गेल आपल्या शैलीत मनसोक्त नाचताना दिसला. त्याने तेथील तीन मुलींसह ठेका धरला आणि त्यांच्या स्टेप्स कॉपी करू लागला.

विधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू! सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय

गुजरात जायंट्स संघ सध्या लीजेंड्स लीग क्रिकेटसाठी जोधपूरमध्ये आहे. सेहवागच्या नेतृत्वाखालील संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला असून आज ते बरकतुल्ला खान स्टेडियमवर एलिमिनेटर सामना खेळतील. गेलने अनुक्रमे १५ आणि ६८ धावा केल्या आहेत. या दोन्ही धावा त्याने भिलवाडा किंग्जविरुद्ध केल्या. गेल आणि सेहवाग व्यतिरिक्त पार्थिव पटेल, केविन ओब्रायन, ग्रॅम स्वान, रिचर्ड लेव्ही आणि अजंथा मेंडिस हे देखील या संघाचा भाग आहेत.