Leopard and dog Fight Video: जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून वाघ, सिंह, बिबट्या यांना ओळखलं जातं. त्यांच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारख्या भयानक प्राण्यांना संगळेच घाबरतात. तुम्ही बिबट्याने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. मात्र बिबट्याची शिकार केलेला व्हिडीओ कधी पाहिलाय का ? तेही कुत्र्यांनी ?‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात अक्षरश: बिबट्याला फाडून टाकलंय.

जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं

बिबट्याच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे बिबट्याच्या नादाला कुणी लागत नाही. पण अशी हिंमत काही कुत्र्यांनी केलीय. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच या कुत्र्यांनी जंगलातल्या चक्क विशाल प्राण्याला आस्मान दाखवलंय. फक्त एवढंच नाही तर पार फाडून टाकलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलामध्ये एक बिबट्या आणि ५ कुत्रे दिसत आहेत. यावेळी तुम्हाला वाटेल की हा एकटा बिबट्या सगळ्या कुत्र्यांचा फडशा पाडेल. मात्र याठिकाणी उलटंच घडलं, या सगळ्या कुत्र्यांनीच मिळून बिबट्याला आपल्या जाळ्यात पकडलं आणि अक्षरश: फाडून टाकलं. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बिबट्या आपला जीव वाचवण्यासाठी या कुत्र्यांना संपूर्ण ताकदीने प्रतिकार करताना दिसत आहे. मात्र या कुत्र्यांच्या ताकदीपुढे बिबट्याचं काहीच चाललं नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शेतकऱ्यांनो शेतात फवारणी करायला जात असाल तर सावधान; ‘हा’ VIDEO पाहून फुटेल घाम

हा सगळा थरारक प्रकार एका व्हिडीओत रेकॉर्ड झाला आहे. सोशल मीडियावर @TheBrutalNature नावाच्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.  या व्हिडीओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील एकानं म्हंटलं आहे की, “जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं!”