सोशल मीडियावर तुम्ही अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहिले असतील, जे पाहून तुम्हाला नक्कीच हसू आले असेल. वन्यजीवांबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

‘शिकार करो या शिकार बनो’

कुत्र्याचा फडशा पाडणारे बिबटे तुम्ही अनेक पाहिले असतील. पण बिबट्याच्या तावडीतून एका कुत्र्यानं स्वतःला आश्चर्यकारकरीत्या वाचवलंय. ही थरारक आणि चकीत करणारी घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. बिबट्यानं आपल्या जबड्यात कुत्र्याची मान घट्टा शिकार करण्यासाठी पकडली होती. पण डेअरींगबाज कुत्र्यानं शेवटच्या श्वासापर्यंत हार मानली नाही. तो लढत राहिला. बिबट्यासमोर मोठ्या धीरानं आपल्या लढा दिला. पण अगदी मोक्याच्या क्षणी स्वतःची सुटका कुत्र्यानं करुन घेतली आणि बिबट्याला अखेर निराशच माघारी परतावं लागलं.

मानगुटीवर बसलेल्या बिबट्याच्या तावडीतून कसा निसटला कुत्रा

थरारक झटापटीत बिबट्यानं कुत्र्याच्या मानेवर हल्ला केला. आपल्या जबड्यात कुत्र्याची मान कसकन बिबट्यानं पकडली होती. बिबट्याची पकड इतकी जबरदस्त होती की बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठी कुत्रा हा सर्वतोपरी प्रयत्न करत होता. पण बिबट्याच्या तावडीतून सुटणं तितकं सोपं नव्हतं. कधी कधी शांत राहिल्यानं बऱ्याच संकाटातून मार्ग निघतात, हेच या कुत्र्यानं केलं. कुत्र्यानं शांत राहण्याचा निर्णय घेतला आणि संधी मिळताच बिबट्याच्या तावडीतून सुसाट निसटला. अखेरीस बिबट्यानं चावा घेण्याच्या हेतून तोंड थोडं हलकं केलं. आणि तितक्यातच कुत्रा बिबट्याच्या जबडेतून सुटण्यासाठी पळाला.अवघ्या काही क्षणांच्या आत बिबट्यानं कुत्र्याची शिकार गमावली. यानंतर बिबट्या एका दिशेला तर कुत्रा दुसऱ्या दिशेला सैरावैरा पळत सुटले आणि गायब झाले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘शिकार करो या शिकार बनो’ मृत्यूच्या दारात माकडाने केला पँथरचा मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video

हा सगळा थरारक प्रकार एका व्हिडीओत रेकॉर्ड झाला आहे. इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.  या व्हिडीओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी स्माईली इमोजी सेंड करुन मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.