Leopard Viral Video: : मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातून एक अत्यंत भयानक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये असं दिसतं की एक बिबट्या अचानक वस्तीमध्ये घुसला आणि त्यानंतर जे तिथे जे काही घडलं ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.

एबीपी लाईव्हच्या वृत्तानुसार असं सांगितलं जात आहे की ही घटना धामनोद वन परिक्षेत्रातील गुजरी डेहरिया गावातील आहे, जिथे बिबट्याने लोकांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर संपूर्ण गावात गोंधळ उडाला असून लोक घराबाहेर पडण्यासही घाबरू लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या अचानक जंगलातून बाहेर येऊन वस्तीमध्ये आला. सुरुवातीला लोकांना काहीच समजलं नाही, पण काही क्षणातच त्याने लोकांवर झडप घालायला सुरुवात केली.

बिबट्या व्हायरल व्हिडीओ (Leopard Attack Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बिबट्याशी झुंज देताना दिसतो आहे आणि काही वेळ तो बिबट्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसतो. व्हिडिओमध्ये एक क्षण असा येतो की ती व्यक्ती बिबट्याच्या वर बसलेली दिसते. हा प्रकार इतका धोकादायक होता की आसपासचे लोक घाबरले आणि आपला जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागले. असं या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येतंय.

काठ्या घेऊन आले ग्रामस्थ, तेव्हा पळाला बिबट्या

पुढे व्हिडिओमध्ये दिसतं की जसे गावातील इतर लोक काठ्या घेऊन तिथे पोहोचले, तेव्हा परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली. ग्रामस्थांनी एकत्र येऊन आरडाओरडा केला आणि बिबट्याला घेरण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर बिबट्या तिथून पळून गेला. मात्र या संपूर्ण घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा जंगल आणि वस्ती यांच्यात वाढत चाललेला संघर्ष समोर आला आहे.

सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया

या धोकादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत. काही जण याला “मृत्यूच्या दारातून परत येणं” असं म्हणत आहेत, तर काही जण अशा भागात अधिक सुरक्षिततेची गरज असल्याचे सांगत आहेत. अनेक लोक त्या व्यक्तीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत ज्याने बिबट्याशी सामना केला, तर काही जण असा व्हिडिओ भीतीदायक आणि चिंताजनक असल्याचे म्हणत आहेत. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)