Viral video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. अगदी बिबट्या सुद्धा. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. एका बिबट्यानं जंगली डुकराशी पंगा घेतला. जंगली डुकाराची शिकार करण्याचा बिबट्याचा डाव फसला अन् तो तोंडावरच आपटला. बिबट्याला धडा शिकवण्यासाठी डुकरानं लढवलेली शक्कल पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जंगल म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर भीती, थरार आणि जीवघेणी झुंज उभी राहते. साधारणपणे लहान डुकरे ही जंगलातील भक्षक प्राण्यांच्या हाती सहज शिकार ठरतात. पण, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या एका भन्नाट व्हिडीओनं ही समजूतच पूर्ण बदलून टाकली आहे. कारण- एका डुकरानं बिबट्याला अशी झुंज दिली की, पाहणारेही चकित होऊन गेले.
एरवी जंगलातील सर्व प्राणी ज्याला घबरतात अशा बिबट्याचा डुकरानं चांगलाच गेम केला आहे. एरवी सगळ्या प्राण्यांना पळवणाऱ्या बिबट्याला डुकरानं सळो की पळो करुन सोडलं आहे. जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांनी हे सर्व कॅमेरामध्ये कैद झालं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बिबट्यानं जंगली डुकराला स्वत:च्या जबड्यात पकडून ठेवलं आहे. डुक्कर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. या दोघांचाही संघर्ष सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. शेवटी जंगली डुकरानं बाजी जिंकली आणि बिबट्याला थेट मगरीच्या तोंडी देत मात करण्यात यशस्वी झाला. मास्टरमाईंट डुक्कराची चाल बघून सर्वच शॉक झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
. व्हिडिओला हजारो लाइक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. “वॉर्थॉग बिबट्यापेक्षा जवळजवळ दुप्पट मोठा होता. त्यामुळेच तो बिबट्याला हरवू शकला. दुसऱ्या वापरकर्त्यानं “प्राण्यांची खरी लढाई! अशी प्रतिक्रिया दिली आहे.
एका यूजर्सने तर कमेंटमध्ये लिहले की, तो घाबरला आहे पण त्याने भीतीपोटी विरोध करण्याचे धाडस केले. त्यामुळे कदाचित तो वाचला असेल. भीती वाटणे साहजिक आहे पण भीतीपोटी लढणे थांबवणे चूकीचे आहे. तर अनेकांनी बिबट्याला घाबरट म्हटले तर अनेकांनी डुकराच्या हिमतीला दाद दिली.
