Leopard Viral Video: सध्या जंगलतोड किंवा अन्य कारणांमुळे अनेकदा काही गावांमध्ये, रस्त्यांवर बिबट्यांचा वावर दिसतो. वस्तीत अचानक बिबट्या शिरल्याने रहिवाशांची पळता भुई थोडी होते. आपण अनेकदा असे प्राणी फार फार तर सिनेमांमध्ये पाहतो. पण, विचार करा जर तुमच्यासमोर प्रत्यक्षात अचानक बिबट्या आला तर… अशी परिस्थिती कोणावर ओढवली तर त्या व्यक्तीची स्थिती तिथेच घाबरगुंडीनं अर्धमेल्यासारखी होईल हे नक्कीच.

बिबट्याच्या दहशतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. आता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, जिथे बिबट्या लहान मुलांसमोर आला आहे. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…

बिबट्या धावत आला अन्… (Leopard Attack Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमच्या तोंडचं पाणीच पळेल. या व्हिडीओत आपण पाहू शकतो, की घराबाहेर काही लहान मुलं खेळताना दिसतायत. खेळता खेळता त्यांच्याजवळ एक कुत्रा येतो. जणू त्याला तिथे बिबट्या येणार हे आधीच कळलेलं असतं. कुत्रा तिथे येताच अचानक घराच्या मागच्या बाजूने एक बिबट्या जोरात धावत येतो पण कुत्र्याला पाहून तो तिथून पळून जातो. बिबट्याला पाहताच कुत्रा आणि मुलंदेखील धूम ठोकून पळतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @primezewsmarath या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ४.६ मिलियन वर व्ह्यूज आले आहेत. तसंच “घराबाहेर मुलं खेळत होती तेवढ्यात बिबट्या आला अन्…, CCTV फुटेजच्या १५ सेकंदात कैद झाला भयावह क्षण ” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कुत्र्यामुळे मुले वाचले नाहीतर बिबट्याने त्यांना उचललं असतं”, तर दुसऱ्याने “बिबट्याच घाबरला” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “कुत्रा होता म्हणून संकट गेलं नाहीतर जीव गेला असता”