scorecardresearch

दोघांची नजरेला नजर भिडली, बिबट्या कासवगतीनं आला, नंतर गिअर बदलला, पाहा हरणाच्या शिकारीचा थरारक Video

हरणाला बिबट्या शिकार कारायला आल्याचा अंदाज येताच बिबट्याने त्याचा रंग दाखवला.

leopard caught deer viral video on internet
चपळ बिबट्याने हरणाची केली शिकार. (image-social media)

भक्ष्य शोधण्यासाठी रानावनात मुक्त संचार करणारे वन्यप्राणी किती चपळ असतात, हे एका व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. वाघ, सिंह, बिबट्यासारखे हिंस्र प्राणी छोट्या मोठ्या प्राण्यांना त्यांच्या जाळ्यात अडकवतात आणि शिकार करतात. एका बिबट्यानेही मोठी शक्कल लढवत गवतात चरणाऱ्या हरणाची शिकार केली. बिबट्या चालाखी करत कासवगतीने हरणाजवळ गेला. हरणाला बिबट्या शिकार कारायला आल्याचा अंदाज येताच बिबट्याने त्याचा रंग दाखवला आणि भरधाव वेगाने हरणाला जमिनीवर पाडले. बिबट्याने शिकार करण्यासाठी बुद्धीचा कस लावला अन् शिकार करण्याचं ध्येय गाठलं. बिबट्याने हरणाची शिकार केलेला थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

IFS रमेश पांडे यांनी बिबट्याचा थरारक व्हिडीओ केला शेअर

भारतीय वन अधिकारी रमेश पांडे यांनी बिबट्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. माळरानात असलेल्या हरणाची आणि बिबट्याची नजर एकमेकांना भिडते. पण हरणाला बिबट्या कासवगतीनं कधी जवळ येतो, याचा अंदाज येत नाही. बिबट्या अगदीच जवळ आल्यानंतर हरणाला हरणाला आपली शिकार होणार आहे, याची खात्री होते. त्यानंतर हरण बिबट्याला पाहून धूम ठोकतो. मात्र, कासवगतीने आलेल्या बिबट्यानं गिअर बदलून त्याच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे भरधाव वेगात जाऊन हरणाची शिकार केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – बापरे! आकाशात भरारी घेणारं विमान जमिनीवर उतरताच कोसळलं, पायलटने थेट पॅराशूटच उडवला अन्…, पाहा थरारक Viral Video

इथे पाहा व्हिडीओ

बिबट्या खूप चतुर आणि चालाख असल्याचं कॅप्शनही पांडे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओला दिलं आहे. बिबट्याचा हा थरारक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला ७ हजारांहून अधिक व्यूज मिळाले असून शेकडो नेटकऱ्यांनी लाईकही केलं आहे. तसंच नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं, “बिबट्याकडे जबरदस्त संयम आहे, असं मी नक्कीच म्हणेल.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, “अप्रतिम संयम आणि दृष्टीकोन”. तर अन्य एक नेटकरी म्हणाला, “बुद्धीमत्ता आणि चपळता हे यशाचे गमक आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-12-2022 at 10:20 IST
ताज्या बातम्या