सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ पहायला मिळतात. आजकाल वन्य प्राण्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळत आहे. प्राण्यांशी संबंधीत व्हिडीओ कायमच चर्चेत असतात. वन्य प्राणी आता हळूहळू मानवी वस्तीकडे येत असून त्यांच्या हल्ल्याचेही बरेच व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. अंगावर काटा आणणारे अनेक शिकारीचे व्हिडीओ इंटरनेटवर फिरत असतात. कोण कधी अचानक कोणावर हल्ला करेल याचा काही नेम नसतो. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये बिबट्या आणि ब्लॅक पँथर यांच्यात लढाईचा थरार पाहायला मिळालाय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता बिबट्या आणि ब्लॅक पँथरचा आमनेसामने आला. बिबट्या झाडावर होता आणि ब्लॅक पँथर खाली. पण बिबट्याला पाहून ब्लॅक पँथरही झाडावर चढला. त्यानंतर दोघांमध्ये थरार पाहायला मिळाला.दोघंही एकमेकांकडे पाहत गुरगुरतात, डरकाळ्या फोडतात. बिबट्याला तशी पळायला वाटच नाही. ब्लॅक पँथरचीही पुढे जाण्याची हिंमत नाही. दरम्यान ब्लॅक पँथर गुपचूप तिथून माघार घेतो आणि झाडावरून खाली उतरतो.




पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: विधी सुरु असताना नवरदेवानं नवरीला केलं किस, नवरीची रिअॅक्शन पाहून म्हणाल…
दरम्यान, जंगलातील प्राण्यांचे असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. त्यांच्या थराराक व्हिडीओंना नेहमीच नेटकऱ्यांची पसंती असते. आत्तापर्यंत असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. लोकांना वन्य जीवन, प्राणी, यांमध्ये जास्त रस असल्यामुळे ते असे व्हिडीओ वारंवार पाहतात.