आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात अनेकदा अन्नाच्या शोधात असलेला हत्तींचा कळप जंगलातून गावात प्रवेश करतात. असाच एका कळपातून भरकटलेला हत्ती गावाजवळील शेतातील खोल विहिरीत पडला. मिळालेल्या माहितीनुसार, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हत्तीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी जेसीबी मागवला. त्यानंतर विहीर खोदून हत्तीला बाहेर काढण्यात आले . या बचाव मोहिमेचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला असून, तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ही घटना बंगारुपालेम मंडळ परिसरातील गंडलापल्ली गावाजवळील एका शेतातील आहे. व्हायरल क्लिपमध्ये, आपण खाली पडलेला हत्ती आपला जीव वाचवण्यासाठी आणि विहिरीतून बाहेर पडण्यासाठी धडपड करताना पाहू शकता. त्याचवेळी वनविभागाची टीम आणि घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना दिसत आहेत. ग्रामस्थांनी हत्तीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र ते हत्तीला बाहेर काढू शकले नाहीत. अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी मागवला. यानंतर विहिरीच्या दोन्ही बाजू तोडून हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले.

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
Attack on hotel businessman
आपटे रस्त्यावर हॉटेल व्यावसायिकावर हल्ला करणारे गजाआड; संपत्तीच्या वादातून मेहुण्याकडून मध्य प्रदेशातील पहिलवानांना सुपारी
Ghatkopar
घाटकोपरमध्ये बंदुक विकण्यासाठी आलेल्या आरोपीला अटक

( हे ही वाचा: जगातील खतरनाक ‘स्टंट’ ज्याने मृत्यूलाही हरवले; हर्ष गोएंका यांनी शेअर केलेला Video एकदा पाहाच)

विहिरीत पडलेल्या हत्तीला बाहेर काढण्याचा रेस्क्यू व्हिडिओ येथे पहा

( हे ही वाचा: श्रद्धेला सीमा नाही! मंदिरात घंटा वाजवण्यासाठी चक्क कुत्र्याची हजेरी; व्हायरल Video पाहून नेटकरी म्हणतात, ”हा खरा…”)

गावकऱ्यांनी सांगितले की हत्तीला बाहेर काढणे खूप कठीण होते. यासाठी जेसीबी मशीन मागवावी लागली. त्यानंतर विहिरीच्या दोन्ही बाजू तोडून हत्तीला बाहेर काढता यावे यासाठी विहीर खोदण्यात आली. त्यानंतर हत्ती विहिरीच्या बाहेर आला. हत्ती विहिरीतून बाहेर येताच सरळ जंगलात पळत सुटला. आता हा रेस्क्यू बघून लोक वनविभागाचे कौतुक करत आहेत.

रेस्क्यूवर लोकांच्या प्रतिक्रिया एकदा पाहाच

( हे ही वाचा: ट्रेनच्या अप्पर सीटवरून खाली येण्यासाठी लहान बाळाची ‘निंजा टेक्निक’, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ Video एकदा बघाच)