Lift Accident Viral Video : अपघात कधी होईल काही सांगता येत नाही, धक्कादायक अपघातांचे भयानक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. यात काहीवेळा इतके भयानक दृश्य असतात की पाहताना आपल्याला भीती वाटते. सध्या अशाच एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय. गुजरातच्या वलसाड शहरातील लिफ्ट अपघाताचा हा व्हिडीओ आहे, ज्यात सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास लिफ्ट कशी जीवघेणी ठरू शकते हे दिसतेय.
या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात स्पष्ट दिसतेय की, एक व्यक्ती लिफ्टमध्ये प्रवेश करते आणि लिफ्टच्या दाराजवळच डोकं पुढे करून ती उभी आहे, थोड्या वेळाने लिफ्टचा दरवाजा उघडतो आणि ती व्यक्ती लिफ्टमधून बाहेर पडताच लिफ्टचा अचानक अपघात झाला. लिफ्ट वेगाने वर जाऊ लागली. यावेळी त्या व्यक्तीने एक पाय बाहेर ठेवला आणि दुसरा पाय बाहेर काढणार इतक्यात ती व्यक्ती लिफ्टबाहेर फेकली गेली, त्यामुळे ती थोडक्यात बचावली.
वलसाडमधील एका गृहनिर्माण सोसायटीतील साबरमती इमारतीत ३ मार्च २०२६ रोजी लिफ्टचा हा भीषण अपघात झाला; तर वत्सलभाई पांचाळ असे अपघातातील पीडित व्यक्तीचे नाव आहे. ते याच इमारतीचे रहिवासी आहेत.
लिफ्टच्या अपघाताचा भयानक व्हिडीओ
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, वत्सलभाई पांचाळ लिफ्टमधून बाहेर येत होते, यावेळी त्यांनी एक पाय बाहेर ठेवला आणि ते पूर्णपणे बाहेर पडणार इतक्यात अचानक लिफ्ट सुरू झाली, लिफ्ट वेगाने वर जाऊ लागली, यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते लिफ्टच्या बाहेर फेकले गेले, यावेळी एक सेकंदाचा जरी उशीर झाला असता तरी वत्सलभाई पांचाळ लिफ्ट आणि भिंत यामधे अडकून चिरडले गेले असते, मात्र सुदैवाने त्यांचा जीव वाचला. हा अपघात इतक्या पटकन झाला की त्यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. यात त्यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या आहेत.
सीसीटीव्ही फुटेजवरून या घटनेची भीषणता स्पष्टपणे जाणवते. पण, या घटनेनंतर उंच इमारतींमधील लिफ्टची सुरक्षा आणि त्यांच्या नियमित देखभालीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
