सोशल मीडिया म्हटलं की, वेगवेगळ्या विचारांचं व्यासपीठ. या व्यासपीठावरून नेटिझन्सना वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती मिळत असते. व्हिडिओ किंवा पोस्टच्या माध्यमातून ज्ञानात भर पडत असते. कंटेन्ट क्रिएटर्सही नवनवे व्हिडिओच्या माध्यमातून नेटिझन्सना प्रभावित करत असतात. या माध्यमातून आतापर्यंत काही लोकांना कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. कॅनडाच्या ओंटेरियो येथे राहणाऱ्या Linda Bytyqi यांनी वयाच्या २७ वर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. आता इतर लोकांना कोट्यवधी रुपयांची कमाई कशी करायची? याबाबत माहिती देत आहे. Linda Bytyqi यांनी ६ वर्षांपूर्वी म्हणजेच २१ वर्षांच्या अस्ताना काही पैशांची गुंतवणूक रियल इस्टेट बिझनेसमध्ये केली होती. त्यात गेल्या सहा वर्षात १२० कोटींची संपत्ती जमा केली आहे.

Linda Bytyqi या सोशल मीडियावर रियल इस्टेट इन्व्हेस्टर, बिझनेश इन्व्हेस्टर आणि बिझनेस कोच म्हणून मार्गदर्शन करतात. Linda यांच्या नावावर सध्या १२० फ्लॅट असून भाड्यावर दिले आहेत. त्या माध्यमातून तिला कोट्यवधींची कमाई होत आहे. आता सोशल मीडियावर लोकांना या माध्यमातून पैसे कसे कमवायचे याबाबत टिप्स देत आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

भारतातही रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीची प्रमाण सर्वाधिक आहे. या क्षेत्रात पैसे अडकण्याची शक्यता खूपच कमी असते. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे वर्षभरात जागेचे भाव गगनाला भिडतात. त्यामुळे गुंतवलेल्या पैशांच्या दुप्पट पैसे जमा होतात. मात्र गुंतवणुकीसाठी हातात एक मोठी रक्कम असायला हवी हे तितकंच खरं आहे.