सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओचं व्यासपीठ आहे. कोणता ना कोणता व्हिडिओ रोज व्हायरल होत असतो. सोशल मीडियावर प्राण्याचे मजेदार व्हिडिओ आपण नेहमीच पाहत असतो. मात्र जंगली आणि पाळीव प्राणी समोरासमोर आले तर काय? असं आपल्याला नेहमी वाटतं. प्रत्येक वेळी जंगली प्राणी पाळीव प्राण्यावर हल्ला करेलच असं नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सिंह आपल्या स्वभावाच्या विरुद्ध वागताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकीत होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडिओत एक कुत्रा आणि सिंह दिसत आहे. व्हिडिओ सुरु होण्यापूर्वी तुम्हाला वाटेल की आता सिंह कुत्र्यावर हल्ला करेल. मात्र व्हिडिओ जसजसा पुढे जाईल तसं तुम्हाला सिंहाच्या कृतीचं कौतुक वाटेल. सिंह आणि कुत्रा चक्क एकमेकांशी खेळू लागतात. एकमेकांना आधीपासून ओळखत असल्याचं त्यांच्या कृतीवरून दिसतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lion and dog viral video on social media rmt
First published on: 07-01-2022 at 17:02 IST