Lion Attack On Buffalo Video : ‘इथे तुम्ही एकतर शिकार करा, नाहीतर कोणाची तरी शिकार बना’, हा जंगलाचा एक क्रूर नियम आहे. सोशल मीडियावर असाच एका शिकारीचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होत असून तो पाहून छातीत धडकी भरल्याशिवाय राहत नाही.

व्हिडिओमध्ये दिसल्यानुसार, नदीच्या काठावर जंगली म्हशींचा एक मोठा कळप शांतपणे पाणी पित होता. परिसर अगदी शांत होता; पण झुडपांमागे ‘काळ’ आधीपासूनच दबा धरून बसलाय, याची म्हशींना पुसटशी कल्पनाही नव्हती.

अचानक झाला भयानक हल्ला

झाडीत लपलेला एक भुकेलेला, हिंस्र सिंह पापणी लवण्याआधीच विजेच्या वेगाने कळपावर तुटून पडला. सिंहाची धाव पाहताच संपूर्ण कळपात एकच पळापळ झाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हशी वाट मिळेल तिकडे पळू लागल्या. ज्या ठिकाणी काही क्षणांपूर्वी शेकडो म्हशी उभ्या होत्या, तिथे अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मान पकडली आणि ओढत नेले मृत्यूच्या दारात

या गोंधळात एक दुर्दैवी म्हैस सिंहाच्या तावडीत सापडली. सिंह किंचितही वेळ न घालवता तिच्यावर झेपावला आणि त्याने थेट तिच्या मानेत टोकदार सुळे खुपसले. म्हशीने सुटका करून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण जंगलाच्या राजाची पकड लोखंडासारखी मजबूत होती. बघता बघता सिंह तडफडणाऱ्या म्हशीची मान पकडून तिला ओढत झुडपात घेऊन गेला. हा व्हिडिओ आफ्रिकेतील जंगलातील असल्याचे म्हटले जात आहे.

व्हिडिओ पाहून लोक हादरले

<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?height=476&href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Freel%2F3513481888819088%2F&show_text=true&width=267&t=0" width="267" height="591" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowfullscreen="true" allow="autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share" allowFullScreen="true"></iframe>

‘Animals Companies’ नावाच्या फेसबुक पेजवरून हा शिकारीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर अनेक युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. जंगली म्हशींचा एवढा मोठा कळप असतानाही सिंहाने ज्या वेगाने हल्ला केला, ते खरोखरच अंगावर काटा आणणारे होते, असे अनेकांचे म्हणणे आहे. तर काहींच्या मते, कळपापासून वेगळे होताच म्हैस तावडीत सापडणे हे जंगलाचे निर्दयी वास्तव दर्शवते.