सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा त्याला एखाद्या प्राण्याची की शिकार करायला वेळ लागत नाही. जंगलातील इतर कोणताही प्राणी त्याच्यासमोर उभे राहण्याची किंवा त्याला आव्हान देण्याचे धाडस करत नाही. चुकूनही एखादा प्राणी त्याच्या वाटेला आला, तर पळून जाण्याशिवाय गत्यंतर नसतं. मात्र अनेकदा जीवाची बाजी पणाला लागली असताना सिंहाला सडेतोड उत्तर देण्यास प्राणी मागे पुढे पाहात नाहीत. जर सिंहाचं भक्ष्य पिल्लं असेल तर मग शेवटी आईचा लढा व्यर्थ कसा जाईल? आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी ती काहीही करण्यास तयार असते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात झेब्राने सिंहाला धडा शिकवला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत सिंह आपली भूक शमवण्यासाठी झेब्राच्या पिल्लावर हल्ला करतो. पण आई आपल्या मुलाला सिंहाच्या जबड्यातून काढण्यासाठी जीवाची बाजी पणाला लावते. सिंहाला मागच्या पायांनी जोरदार लाथ मारताना दिसते. आईचा आक्रमकपणा पाहून शेवटी सिंहही हतबल होतो आणि पिल्लाला सोडून देतो. त्यानंतर आईही तिथून सुखरूप निघून जाते. शेवटी जंगलाच्या राजाला आपल्या शिकारीत अपयशाची चव चाखावी लागते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या बातमी आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. नेटकरी प्रेमाचे आणि धैर्याचे कौतुक करत आहेत.